masked aadhaar card: तुम्ही जेव्हा OYO रूम बुक करतात किंवा हॉटेलमध्ये गेल्यावर तुमचे आधार कार्ड देतात, तेव्हा ओरिजनल आधार कार्डची कॉपी देऊन टाकतात. परंतु हा प्रकार तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकतो. यामुळे तुमची महत्वाची माहिती लिक होऊ शकते. तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. यामुळे आधार कार्ड देण्यापूर्वी खबरदारी घ्या. मास्कड आधार कार्ड (Masked AADHAAR CARD) द्या. या आधार कार्डमध्ये तुमची सर्व माहिती सुरक्षित असते.
आधार कार्डप्रमाणे मास्कड आधार कार्ड एक महत्वाचे दस्ताऐवज आहे. त्याचा वापर तुम्ही ओळखपत्र म्हणून करु शकतात. मास्कड आधार कार्डमध्ये आधार नंबरचे पहिले 8 अंक लपलेले असतात. लोकांना फक्त 4 अंक दिसतात. तुमचा आधार नंबर दिसत नसल्याने तुमची सर्व माहिती सुरक्षित राहते. त्यामुळे कोणीही तुमचा आधार कार्डचा गैरवापर करु शकत नाही.
मास्कड आधार कार्डचा वापर ट्रेनमध्ये प्रवास करतात, हॉटेल बुकींग करतात, विमानतळावर सर्वच ठिकाणी करु शकतात. आधार कार्ड सर्वच ठिकाणी गरजेचे झाले आहे. ते एक महत्वाचे ओळखपत्र झाले आहे. परंतु त्या माध्यमातून तुमची सर्व माहिती लिक होण्याचा धोका आहे. यामुळे आधारकार्ड कुठेही देताना मास्कड आधार कार्डचा वापर करा.