मुंबई : Vivo X70 सिरीज दोन आठवड्यांपूर्वी भारतात अधिकृतपणे लाँच झाली होती. याअंतर्गत X70 Pro आणि X70 Pro + हे दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आले. Vivo X70 सिरीजसाठी कंपनीने Zeiss सोबत भागीदारी केली आहे. म्हणजेच, आता फोनच्या सर्व कॅमेरा लेन्स नवीन Zeiss T लेन्स कोटिंगसह येतील. त्याच्या मदतीने तुम्ही आता नॅचरल फोटो क्लिक करु शकाल. दरम्यान, Vivo X70 सिरीजची विक्री सुरू झाली आहे. (Vivo X70 Series With 50MP Gimbal Camera, Sale Live in India, check Price, features)
Vivo X70 Pro ची सुरुवातीची किंमत 46,990 रुपयांपासून सुरू होत आहे, ज्यामध्ये तुम्हाला 8 GB RAM आणि 128 GB स्टोरेज पर्याय मिळेल. तर 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 49,990 रुपये असेल. त्याचबरोबर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 52,990 रुपये आहे. X70 प्रो ची विक्री गेल्या आठवड्यापासून सुरू झाली आहे. Vivo X70 Pro + ची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये आहे ज्यात तुम्हाला 12 GB RAM आणि 256 GB स्टोरेज पर्याय मिळेल. दरम्यान, या फोनचा सेल उशिराने सुरु करण्यात आला आहे. कालपासून हा फोन ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.
X70 प्रो 6.5-इंच फुल एचडी+ डिस्प्लेसह येतो. ही एक AMOLED स्क्रीन आहे ज्याचा कमाल रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोनमध्ये सर्व नवीन फ्लोराईट एजी कोटिंग देण्यात आले आहे जेणेकरून वापरकर्त्यांना स्मूद अनुभव मिळेल. कंपनीने यात फिंगरप्रिंट दिलेले नाही. 3D कर्व्ड डिस्प्ले X70 सिरीजसाठी उपलब्ध आहे.
फोन दोन रंग पर्यायांमध्ये येतो ज्यात तुम्हाला ऑरोरा डॉन आणि कॉस्मिक ब्लॅक मिळेल. फोन MediaTek Dimensity 1200 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास हा फोन 50 मेगापिक्सेल सेन्सर सह येतो. त्याच वेळी, यात दोन 12 मेगापिक्सेल कॅमेरे आणि 8 मेगापिक्सेल पेरिस्कोप लेन्स आहे. कॅमेरा गिंबल स्टॅबिलायझेशनसह येतो, जो तुम्हाला मुख्य कॅमेरा म्हणजेच 50 मेगापिक्सेलमध्ये मिळतो. सर्व कॅमेऱ्यांमध्ये Zeiss T कोटिंग देण्यात आले आहे.
फोनमधील आणखी काही वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात तुम्हाला डेडिकेटेड पोर्ट्रेट मोड, प्रो सिनेमॅटिक मोड आणि नवीन रिअल टाइम एक्सट्रीम नाईट व्हिजन मोड मिळेल. डिव्हाइसमध्ये 4450mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 44W फ्लॅश चार्जला सपोर्ट करतो. तसेच यात 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Vivo X70 Pro + मध्ये 6.78-इंच UHD स्क्रीन आहे जी AMOLED डिस्प्लेसह येते. यात 20: 9 आस्पेक्ट रेशियो आहे आणि 120Hz च्या डायनॅमिक रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसर आहे. Vivo हे डिव्हाईस भारतात फक्त एका व्हेरिएंटमध्ये लॉन्च करत आहे जे 12 GB RAM आणि 256 GB स्टोरेजसह येते.
कंपनीने याच्या कॅमेऱ्यात मोठा बदल केला आहे. यामध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी शूटर कॅमेरा मिळतो जो सॅमसंग जीएन 1 सेन्सर वापरुन बनवलेला आहे. यात 48 मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा देखील आहे. यात 12 मेगापिक्सेल पोर्ट्रेट कॅमेरा, 8 मेगापिक्सेल पेरिस्कोप कॅमेरा आहे. पेरिस्कोप कॅमेरा 5x ऑप्टिकल झूम, 60x सुपरझूम आणि OIS ला सपोर्ट करतो. यात 50 मेगापिक्सेल गिम्बल स्टेबलायझेशन तंत्रज्ञान देखील मिळते. Vivo X70 Pro+ कंपनीच्या V1 इमेजिंग टिपसह येतो.
डिव्हाइसमध्ये 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 55W फास्ट चार्जला सपोर्ट करतो. यामध्ये 50W वायरलेस फ्लॅश चार्जर सपोर्ट देण्यात आला आहे. वायरलेस फास्ट चार्जर स्वतंत्रपणे 4990 रुपयांना खरेदी करावा लागेल.
इतर बातम्या
OnePlus 9RT लवकरच भारतात लाँच होणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Amazon Great Indian Festival : Redmi चा शानदार स्मार्टफोन अवघ्या 7,020 रुपयात, जाणून घ्या ऑफर
‘या’ स्मार्टफोनमध्ये जबरदस्त कॅमेरा मिळणार, 2021 मध्ये हे टॉप कॅमेरा फोन घरी आणा
(Vivo X70 Series With 50MP Gimbal Camera, Sale Live in India, check Price, features)