स्मार्टफोन चाहत्यांसाठी विवो कंपनीने त्यांचा एक नवीन स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच केला आहे. विवो कंपनीने Vivo Y19S हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. त्यातच कंपनीने दावा केला आहे की, Vivo Y19s हा डिव्हाईस मागील मॉडेल Vivo Y18s चा सक्सेसर बनू शकतो. कंपनीने यात अनेक मोठे बदल केले आहेत. यात फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५,५०० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. तसेच या स्मार्टफोनला ६.६८ इंचाचा डिस्प्ले सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. हा फोन अँड्रॉइड १४ ओएसवर चालतो. या फोनच्या बँक कॅमेऱ्यात स्क्वेअर शेप असलेली नोटिफिकेशन लाइट देण्यात आली आहे, जी फोनच्या म्युझिक प्लेबॅक, नोटिफिकेशन आणि इतर अलर्टसाठी वेगवेगळ्या रंगात फ्लॅश होताना तुम्हाला दिसणार आहे. यात कोणती स्पेसिफिकेशन्स देण्यात आली आहेत ती जाणून घेऊया.
थायलंडमध्ये Vivo Y19sच्या ४जीबी + ६४जीबी व्हेरिएंटची किंमत THB ३,९९९ (भारतीय चलनानुसार अंदाजे ९, ८४०रुपये) इतकी आहे. तर ४जीबी / १२८ जीबी मॉडेलची किंमत THB ४, ३९९ (अंदाजे१०,८३० रुपये) इतकी आहे. आणि त्यात असलेला ६ जीबी / १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत ४,९९९ (अंदाजे १२,३००रुपये) इतकी आहे. हा लेटेस्ट स्मार्टफोन थायलंडमधील विवो ई-स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.
स्मार्टफोन प्रेमींना यात कंपनीने ग्लॉसी ब्लॅक, ग्लेशियर ब्लू आणि पर्ल सिल्व्हर या कलरमध्ये हा स्मार्टफोन लाँच केला आहे.
डिस्प्ले: विवोच्या नव्या फोनमध्ये ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट, १००० निट्स ब्राइटनेस, आय-प्रोटेक्शन मोड आणि २६४ पीपीआय पिक्सल डेन्सिटीसह ६.६८ इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझोल्यूशन ७२० बाय १,६०८ पिक्सेल आहे.
प्रोसेसर व स्टोरेज : परफॉर्मन्ससाठी फोनमध्ये Unisoc T612 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. ज्यात ४ जीबी/६४ जीबी, ४ जीबी/१२८ जीबी आणि ६ जीबी/१२८ जीबी स्टोरेजमध्ये स्मार्टफोन उपलब्ध आहे.
कॅमेरा: रियर पॅनलमध्ये f /१.८ अपर्चरसह ५० एमपी प्रायमरी सेन्सर आणि f/३.० अपर्चरसह ०.०८ मेगापिक्सल डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे.
बॅटरी:यात १५W वायर्ड फास्ट चार्जिंगसह ५,५०० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
इतर: हा फोन अँड्रॉइड १४ बेस्ड फनटच ओएस १४ कस्टम स्किनवर चालतो. सुरक्षेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, स्प्लॅश आणि वॉटर रेझिस्टन्ससाठी आयपी ६४ रेटिंग, ३०० टक्के व्हॉल्यूम आणि स्पीकर बूस्ट, एसजीएस ५-स्टार ड्रॉप रेझिस्टन्स आणि मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी मिळणार आहे.
कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाल्यास Vivo Y19s मध्ये ४G सपोर्ट असेल. हा वायफाय, बीडीएस, GLONASS, जीपीएस, QZSS, SBAS आणि एफएम रिसीव्हरसह येईल.
मागील फोनच्या तुलनेत यात मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी ५,५०० एमएएच ची आहे. नव्या मॉडेलमध्ये ५ मेगापिक्सलचा सेन्सर आहे, तर आधीच्या मॉडेलमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. नवीन फोन वजनाने थोडा जास्त आहे.