नवी दिल्ली : व्होडाफोन आयडिया (Vi) ने आपल्या 27 कोटी वापरकर्त्यांना ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांपासून दूर राहण्यास सांगितले आहे. हे फसवणूक करणारे नो युवर कस्टमर (KYC) च्या माध्यमातून वापरकर्त्यांना लक्ष्य करत आहेत. सायबर फसवणुकीसंदर्भात एअरटेलने जारी केलेल्या अॅडवायजरीनंतर व्हीआय(Vi)चा इशारा आला आहे. एअरटेलच्या सर्व ग्राहकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात फसवणूक करणारे नवीन तंत्रज्ञानाद्वारे मोबाईल वापरकर्त्यांना कसे शिकार बनवत आहेत हे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाळ विठ्ठलल यांनी सांगितले आहे. असाच एक प्रकार आता व्हीआय(Vi) सब्सक्राइबर्समध्येही दिसून येत आहे, जिथे व्होडाफोन आयडियाचे कर्मचारी बनून फसवणूक करणारे लोक त्यांचा वैयक्तिक डेटा लोकांकडून घेत आहेत आणि वापरकर्त्यांना धमकावत आहेत. (Vodafone Idea warns its users, Jio and Airtel users should also be vigilant)
व्हीआय(Vi)ने त्याच्या सार्वजनिक अॅडवायजरीमध्ये, स्कॅमर्स सब्सक्राईबर्सला कसे टार्गेट करतात, याबाबत वापरकर्त्यांना सतर्क केले आहे. व्होडाफोन आयडियाने आपल्या अॅडवायजरीमध्ये म्हटले आहे की, आम्हाला माहिती मिळाली आहे की, काही व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांना अज्ञात क्रमांकावरून एसएमएस आणि कॉल येत आहेत जे त्यांना त्यांचे केवायसी त्वरित अपडेट करण्यास सांगत आहेत. वापरकर्त्यांनी कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून केवायसी केले नाही तर सिम ब्लॉक करण्याची धमकी दिली आहे. यासह, ते व्हेरिफिकेशन नावावर वापरकर्त्यांची गोपनीय माहिती देखील मिळवतात.
eKYC च्या बनावट मॅसेजमध्ये वापरकर्त्यांना एका विशिष्ट क्रमांकावर कॉल करून आपले व्हेरिफिकेशन करण्यास सांगितले जाते. तसे न केल्यास त्यांचे सिम बंद होण्याची धमकी दिली जाते. या संदेशात असे लिहिलेले असते की, प्रिय ग्राहक, वोडाफोन सिमसाठी तुमचे eKYC प्रलंबित आहे. व्होडाफोन हेल्पलाईन नंबर 786XXXXX वर त्वरित कॉल करा. तुमचा मोबाईल नंबर 24 तासात बंद होईल.
हे फसवणूक करणारे स्वतःला व्हीआयचे कर्मचारी असल्याचे सांगतात आणि त्यांना कॉल किंवा एसएमएसद्वारे केवायसी फॉर्म पूर्ण करण्यास सांगत आहेत. ते तुम्हाला Google Play Store वरून एक क्विक सपोर्ट अॅप इन्स्टॉल करण्यास सांगतील आणि ते तुम्हाला TeamViewer वर घेऊन जातील. हे TeamViewer क्विक सपोर्ट अॅप फसवणूक करणाऱ्याला तुमच्या फोनवर नियंत्रण ठेवण्याची परवानगी देईल आणि नंतर फसवणूक करणारा वापरकर्ता आपल्या फोनवर जे काही करेल ते सहज पाहू शकेल आणि तुमचे बँकिंग पासवर्ड इत्यादी देखील मिळवू शकेल. जर या फसवणूक करणाऱ्यांना तुमची माहिती मिळाली तर ते तुम्हाला गंभीर नुकसान करू शकतात आणि तुमच्या बँक खात्यातून पैसे चोरू शकतात. एअरटेल आणि व्होडाफोन व्यतिरिक्त, अलीकडेच सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (COAI) ने देखील इशारा दिला आहे की सर्व मोबाईल वापरकर्त्यांना केवायसी संदर्भात स्कॅम एसएमएस येत आहेत आणि ते टाळण्याची गरज आहे. (Vodafone Idea warns its users, Jio and Airtel users should also be vigilant)
6 लाखांचं डील, मुलीशी लग्न करण्याचं ठरलं, मुलाने 50 हजारही दिले, पण नवरदेवाला लग्नाआधीच खरं समजलं आणि….https://t.co/dyexvHDEcQ#Robbery #FakeMarriageRobberyBridegand #Bride #Crime
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 1, 2021
इतर बातम्या
बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा फायदा शिवसेनेला मुंबई महापालिका निवडणुकीत होणार?
नाशिकमध्ये 15 ऑगस्टपासून हेल्मेट सक्ती, नियम मोडल्यास किती दंड ठोठावणार?