15 हजारांपेक्षा स्वस्त 5G स्मार्टफोन घ्यायचा आहे का? मग पाच पर्याय ठरतील बेस्ट

| Updated on: Feb 21, 2023 | 6:50 PM

तुम्हालाही 5 जी स्मार्टफोन घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रेडमी ते सॅमसंगसारखे टॉप ब्रँडन स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन आणले आहेत.

15 हजारांपेक्षा स्वस्त 5G स्मार्टफोन घ्यायचा आहे का? मग पाच पर्याय ठरतील बेस्ट
स्वस्त आणि मस्त! 5G स्मार्टफोन 15 हजारांपेक्षा कमी किमतीत, बजेट मोबाईलबाबत जाणून घ्या
Follow us on

मुंबई : भारतात 5 जी सर्व्हिस सुरु झाली असून अनेक जण आपला हँडसेट बदलण्याच्या तयारीत आहेत. 5 जी सुविधेमुळे हाय स्पीड इंटरनेटचा फायदा घेऊ शकतो. म्हणजेच व्हिडीओ आणि इतर बाबी झटपट पाहाता येणार आहे.भविष्याच्या दृष्टीकोनातून अनेक कंपन्यांनी आपले 5 जी स्मार्टफोन लाँच केलं आहे. पण काही जणांचं बजेट नसल्याने 4 जी स्मार्टफोनवर समाधान मानत आहेत. पण तुम्हालाही 5 जी स्मार्टफोन घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रेडमी ते सॅमसंगसारखे टॉप ब्रँडने स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन आणले आहेत. फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनची किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. यामध्ये न्फिनिक्स हॉट 20 5G, सॅमसंग गॅलक्सी M13 5G, रेडमी नोट 10T 5G, मोटोरोला G62 5G, पोको M4 Pro 5G या स्मार्टफोनचा समावेश आहे. चला तर या फोनबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

Infinix Hot 20 5G: इनफिनिक्स हॉट 20 एक जबरदस्त 5 जी स्मार्टफोन आहे. कमी किमतीत हा फोन चांगले फीचर्स देतो. यामध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 810 चिपसेट असून या फोनची किंमत 13,499 रुपये इतकी आहे.

Samsung Galaxy M13: सध्या भारतात सॅमसंग स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या ब्रँडच्या चाहत्यांसाठी हा बेस्ट पर्याय आहे.यामध्ये 50 मेगापिक्सल कॅमेरा आमि 5000 एमएएच बॅटरी यासारखे फीचर्स आहेत. या फोनची किंमत 14590 रुपये इतकी आहे.

Redmi Note 10T : भारतात रेडमी फोनचेही चाहते आहेत. जर तुम्ही बजेट फोन घेऊ इच्छित असाल तर एक पर्याय चांगला आहे. रेडमी नोट 10 टी हा 5 जी स्मार्टफोन तुम्हाला 14999 रुपयात मिळेल.

Motorola G62 : मोटोरोलाही बजेट फोनच्या बाबतीत मागे नाही. मोटोरोला जी 65 या स्मार्टफोनची मोबाईलप्रेमींमध्ये चर्चा आहे.या स्मार्टफोनची किंमत 14,999 रुपये इतकी आहे. या स्मार्टफोनमध्ये 50 एमपीसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट आहे.

POCO M4 Pro : पोकोचे स्मार्टफोन आता भारतात हळूहळू पाय रोवत आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. त्याबरोबर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असून या फोनची किंमत 14999 रुपये इतकी आहे. यामध्ये 5000 एमएएच बॅटरी आहे.