नवी दिल्ली | 10 जानेवारी 2024 : LG कंपनीने टीव्हीमध्ये नवीन क्रांती आणली आहे. कंपनीने जगातील पहिला ट्रान्सपरंट टीव्ही बाजारात आणला आहे. लास वेगासमध्ये CES 2024 म्हणजे कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक शो सुरु आहेत. त्यात कमालचे गॅझेट सादर होत आहेत. यामध्ये एलजी कंपनीने पण त्यांचा एक खास टीव्ही सादर केला आहे. कंपनी दरवर्षी या शोमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत टीव्ही आणते. पण यावेळी कंपनीने एक खास टीव्ही बाजारात आणला आहे. त्याची जगभर चर्चा सुरु आहे. हा नेहमीचा टीव्ही नाही तर पारदर्शक टीव्ही आहे. LG Signature OLED TV लाँच करण्यात आला आहे. अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…
काय आहे या टीव्हीत खास
केव्हा खरेदी करता येईल हा टीव्ही
ग्राहक त्यांचे सर्व स्ट्रीमिंग डिव्हाईसेस आणि गेम कन्सोल या बॉक्ससोबत कनेक्ट करुन टीव्हीवर पाहू शकतात. Oled TV मॉडलमध्ये स्पीकर खालील बाजू देण्यात आले आहेत. तसेच या टीव्हीला बॅकलाईट्स पण देण्यात आले आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार हा टीव्ही अनेक पर्यायात उपलब्ध होईल. हा टीव्ही एखाद्या फीश टँक सारखा दिसतो.
सॅमसंगचा पारदर्शक डिस्प्ले
समॅसंगने या शोमध्ये त्यांचा पारदर्शक डिस्प्ले दाखवला आहे. पण तो Micro LED व्हर्जन आहे. समॅसंग हा टीव्ही लाँच करेल की नाही, हे अजून समॅसंगने स्पष्ट केलेले नाही. एलजीने पण त्यांच्या टीव्हीची किंमत किती असेल याची माहिती दिलेली नाही. पण कंपनी याच वर्षात 2024 मध्ये हा टीव्ही विक्रीची योजना आखत आहे.