वेब व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी खुशखबर, लवकरच व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलची सुविधा मिळणार

| Updated on: Oct 20, 2020 | 5:01 PM

व्हॉट्सअ‍ॅपवरुन व्हिडीओ कॉल करण्याची सुविधा असली, तरी वेब वर्जनमधून आतापर्यंत फेसटाईम अर्थात व्हिडीओ कॉल करता येत नव्हते.

वेब व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी खुशखबर, लवकरच व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलची सुविधा मिळणार
Follow us on

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅपवरुन व्हिडीओ कॉल करण्याची सुविधा असली, तरी वेब वर्जनमधून आतापर्यंत फेसटाईम अर्थात व्हिडीओ कॉल करता येत नव्हते. मात्र व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युझर्ससाठी खुशखबर आणली आहे. लवकरच तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप वेबवरही व्हिडीओ कॉल सेवा उपलब्ध होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप हे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप काही काळापासून आपल्या वेब सेवेमध्ये बरेच बदल करत आहे. व्हॉट्सअ‍ॅप नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅप वेबच्या माध्यमातून व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल करता येत नव्हता. पण नवीन बदलांनंतर व्हॉट्सअ‍ॅप वेबवरुन व्हिडीओ आणि व्हॉईस कॉलही करता येतील.(Web whatsapp new feature for voice and video calls will be availble)

येत्या काही आठवड्यांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वेबसाठी व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंगचा पर्याय दिला जाऊ शकतो. याबाबतचे काही स्क्रीनशॉट WABetainfo त्यांच्या साईटवर प्रसिद्ध झाले आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर येणार्‍या कॉलवर स्वतंत्र विंडो उघडेल जिथून आपण कॉल स्वीकारु शकतो. व्हॉट्सअ‍ॅप वेबवर कॉल केल्यावर उघडण्यात येणाऱ्या विंडोचे स्वरुप काहीसे वेगळे असेल. सध्या यामध्ये ग्रुप कॉलची सुविधा नसेल, मात्र टप्प्याटप्प्याने वेबवरही ग्रुप व्हिडीओ कॉल शक्य होईल.
लॉकडाऊनच्या काळात घरुन काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे मीटिंग्जसाठी व्हिडीओ कॉल हे फीचर महत्त्वाचे आहे. सध्या व्हॉट्सअॅप वेबवर अशी सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे यूझर्स झूम, गुगल मीट अशा इतर अॅपकडे वळले, त्यामुळे स्पर्धेत टिकण्यासाठी व्हॉट्सअॅप वेबवर व्हिडीओ आणि व्हॉईस कॉलची सुविधा देण्याच्या तयारीत आहे. कोरोनामुळे अनेकांना वर्क फ्राम होमची सवलत देण्यात आली आहे. कार्यालयीन कामासाठी मीटिंग सुरू असतात. यासाठी व्हॉट्सअॅपचा उपयोग वापरकर्त्यांना करता येत नसल्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप नवीन फिचर तयार करत आहे.

संबंधित बातम्या : 

एकाच वेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल, व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर येणार

Pollution | भारतातील मोठ्या शहरांमध्ये प्रदूषण वाढीची समस्या, आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता!

(Web whatsapp new feature for voice and video calls will be availble)