mobile insurance: सध्या मोबाईल प्रत्येक व्यक्तीच्या हातात आला आहे. हजारो रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंतचा मोबाईल अनेक जण वापरत असतात. मोबाईलमध्ये आलेल्या विविध फिचर्समुळे तो कामाचा भाग होतो. एआय, मशीन लर्निंगसारखे फीचर मोबाईलमध्ये येत आहेत. त्यामुळे मोबाईलच्या किंमतीही वाढत आहेत. मोबाईलच्या वाढलेल्या किंमतीमुळे मोबाईल सुरक्षित ठेवणे गरजेचे झाले आहे. सुरक्षेसाठी मोबाईल फोनचा विमा (इंश्योरन्स) घेणे फायदेशीर आहे.
मोबाईल हरवाला किंवा चोरीला गेला तरी विमा घेतल्यास त्याची भरपाई मिळते. तसेच सॉफ्टवेअरचे नुकसान, हार्डवेअरबाबत निर्माण झालेल्या समस्यांसाठी विमा कव्हर असते. फोन पडल्यास, फोनमध्ये लिक्विड गेल्यामुळे झालेले नुकसान, मोबाईलच्या स्क्रिचे झालेल्या नुकसानामुळे विम्यातून भरपाई मिळू शकते. यामुळे मोबाईलचा विमा घेणे फायद्याचा सौदा आहे.
मोबाईलची चोरी झाली किंवा हारवला तर आपल्या मोठा आर्थिक फटका बसतो. त्यापासून वाचण्यासाठी मोबाईलचा विमा असणे गरजेचे आहे. मोबाईल तुटल्यामुळे दुरुस्तीचा खर्च कव्हर होतो. स्मार्टफोनला लिक्विड डॅमेजपासून वाचवणे गरजेचे आहे. पाणी, आद्रता या कारणामुळे फोन खराब होतात. फोन खराब झाल्यावर मोबाईल विम्यामुळे भरपाई मिळते. वारंटी कालावधीत फोन हरवल्यावर भरपाई मिळत नाही, परंतु मोबाईलचा विमा असल्यावर पूर्ण भरपाई मिळते.
मोबाईल विमा घेणे सक्तीचे आहे का? या प्रश्नाचे उत्तर नाही आहे. परंतु मोबाईल विमा एक सेफगार्ड प्रमाणे काम करते. यामुळे मोबाईलचा विमा घेणे ही स्मार्ट च्वाइस आहे.