WhatsApp मध्ये फ्रॉड ग्रुपपासून रोखण्यासाठी नवीन सेफ्टी फिचर, अलर्टमुळे फ्रॉड करणाऱ्यांची कुंडली मिळणार

| Updated on: Jul 13, 2024 | 12:32 PM

WhatsApp Context Card Feature: व्हॉट्सॲपकडून आलेल्या या नवीन सेफ्टी फिचरमुळे युजरची सुरक्षितता अधिक चांगली होणार आहे. या फिचरसाठी युजरला Group privacy settings ॲक्टीव्ह करावी लागणार आहे. हे फिचर मिळवण्यासाठी Google Play Store मध्ये जाऊन व्हॉट्सॲप अपडेट करावे लागणार आहे.

WhatsApp मध्ये फ्रॉड ग्रुपपासून रोखण्यासाठी नवीन सेफ्टी फिचर, अलर्टमुळे फ्रॉड करणाऱ्यांची कुंडली मिळणार
WhatsApp New Feature
Follow us on

WhatsApp Context Card Feature: प्रत्येकाकडे आता स्मार्टफोन झाला आहे. स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप हे अ‍ॅप सर्वांकडून वापरले जाते. परंतु या अ‍ॅपच्या माध्यमातून अनेकदा फ्रॉड ग्रुपमध्ये आपला समावेश केला जातो. सायबर गुन्हेगार त्या माध्यमातून आपली फसवणूक करतात. सायबर गुन्हेगारापासून वाचवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने नवीन फिचर आणले आहे. त्या माध्यमातून अनोळखी लोकांकडून होणारे चॅट, फसवणूक करणाऱ्या ग्रुपपासून वाचता येईल. या फिचरचे नाव Context Cards आहे. या फिचरची माहिती मेटाचे व्हॉट्सअ‍ॅप प्रमुख विल कॅथकार्ट यांनी दिली. काय आहे हे नवीन फिचर…

ही सर्व माहिती युजरला मिळणार

हे सुद्धा वाचा

Context Card फिचर कोणत्या ग्रुपची विस्तृत माहिती देणार आहे. तुम्हाला अचानक ग्रुपमध्ये कोणी समाविष्ट केले, त्याची माहिती फिचरच्या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून मिळणार आहे. तसेच ज्याने ग्रुपमध्ये तुमचा समावेश केला आहे, तो नंबर तुमच्या कॉन्टक्टमध्ये आहे की नाही? त्याने तुमचा ग्रुपमध्ये समावेश केला का? ही सर्व माहिती मिळेल. तुम्हाला कधी ग्रुपमध्ये घेतले? ग्रुप कधी बनवला गेला? ही सर्व माहिती मिळणार आहे. तसेच तुम्ही या ग्रुपमधून बाहेर पडू शकतात.

ग्रुपची तक्रार करता येणार

व्हॉट्सॲपच्या व्हिडिओनुसार, सेफ्टी फिचर अंतर्गत तुम्ही ग्रुपमधील कोणत्याही मेसेजची तक्रार देखील करू शकता. यासाठी तुम्हाला मेसेजवर दीर्घकाळ टॅप करावे लागेल. यानंतर तुम्हाला रिपोर्टचा पर्याय मिळेल. तुम्ही कोणत्याही मेसेजची तक्रार केल्यास, त्याची सूचना कोणालाही पाठवली जाणार नाही. याशिवाय, तुम्ही ग्रुपची तक्रार करु शकाल. ग्रुप चॅट पर्यायावर जावून ग्रुपची तक्रार करता येणार आहे. तुम्ही ग्रुपला तक्रार केल्यास इतर कोणत्याही सदस्याला त्याबद्दल माहिती मिळणार नाही.

व्हॉट्सॲपकडून आलेल्या या नवीन सेफ्टी फिचरमुळे युजरची सुरक्षितता अधिक चांगली होणार आहे. या फिचरसाठी युजरला Group privacy settings ॲक्टीव्ह करावी लागणार आहे. हे फिचर मिळवण्यासाठी Google Play Store मध्ये जाऊन व्हॉट्सॲप अपडेट करावे लागणार आहे.