WhatsApp पेमेंट्सवर कॅशबॅक, Group चॅटसाठी खास डिझाईन, युजर्सना नवे अपडेट्स मिळणार

| Updated on: Sep 26, 2021 | 4:28 PM

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आपल्या अ‍ॅपसाठी नवीन वैशिष्ट्यांच्या (फीचर्स) सिरीजवर काम करत आहे. अलीकडील एका अहवालानुसार, नवीन वैशिष्ट्यांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्स, ग्रुप आणि बरेच काही समाविष्ट आहे.

WhatsApp पेमेंट्सवर कॅशबॅक, Group चॅटसाठी खास डिझाईन, युजर्सना नवे अपडेट्स मिळणार
Follow us on

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आपल्या अ‍ॅपसाठी नवीन वैशिष्ट्यांच्या (फीचर्स) सिरीजवर काम करत आहे. अलीकडील एका अहवालानुसार, नवीन वैशिष्ट्यांमध्ये व्हॉट्सअॅप पेमेंट्स, ग्रुप आणि बरेच काही समाविष्ट आहे. यापैकी काही फीचर्स हे बीटा रोलआउटमध्ये आधीच पाहायला मिळाले आहेत, तर काही विकसित झाल्यानंतर बीटा प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्याची अपेक्षा आहे. फेसबुकच्या मालकीची व्हॉट्सअॅप कंपनी व्हॉट्सअॅप पेमेंट वापरकर्त्यांना कॅशबॅक देण्यावर काम करत आहे, जे व्हॉट्सअॅप युजर्ससाठी सर्वात महत्वाचे फीचर आहे. (WhatsApp to give Cashback Feature for Payments, Multiple Features for Group Chats in Works)

WABetaInfo ने एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे, जो या फीचर्सची झलक दर्शवतो. या स्क्रीनशॉटमध्ये पुश नोटिफिकेशन पाहायला मिळतंय, याद्वारे युजर्सना सूचित केलं जातंय की, युजर्स व्हॉट्सअॅप पेमेंट्सद्वारे त्यांच्या पुढील पेमेंटवर कॅशबॅक मिळवू शकतील.

WABetaInfo चे म्हणणे आहे की, व्हॉट्सअॅप पेमेंटवर कॅशबॅक भविष्यातील अपडेटमध्ये उपलब्ध होईल. जेव्हा ते लॉन्च होईल तेव्हा ग्राहकांना व्हॉट्सअॅप पेमेंट्स वापरण्यासाठी 10 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र अहवालात म्हटले आहे की, लॉन्चची तारीख जवळ येताच कॅशबॅकची रक्कम बदलू शकते.

WABetaInfo च्या अहवालानुसार, कॅशबॅक फक्त भारतात UPI पेमेंटसाठी लागू होईल आणि ते पैसे 48 तासांच्या आत वापरकर्त्यांच्या खात्यात जमा होतील. या क्षणी या फीचरबद्दल फारच कमी माहिती आहे. मात्र व्हॉट्सअॅप देशात पेमेंट फीचरच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी पेटीएम प्रमाणेच कॅशबॅक योजना सुरू करण्याची अपेक्षा करू शकतो.

नवीन व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप फीचर्स

शेवटच्या बीटा अपडेटमध्ये व्हॉट्सअॅप व्हॉट्सअॅप ग्रुप युजर्ससाठी काही नवीन फिचर्स सादर करणार आहे. अँड्रॉइडसाठी व्हॉट्सअॅप 2.21.20.2 बीटा नवीन ग्रुप आयकॉन एडिटर फीचर आणणार आहे. युजर्स ग्रुप आयकॉन डेव्हलप करुन शकतील, ज्यांचा वापर इमेजेसऐवजी ग्रुप प्रोफाईल फोटोच्या रुपात होईल. ग्रुप आयकॉनसह युजर्स हवा तो बॅकग्राऊंड कलर निवडू शकतात.

इतर बातम्या

5000 रुपयांच्या रेंजमध्ये Itel चा ढासू स्मार्टफोन लाँच, युजर्सना फ्री स्क्रीन रिप्लेसमेंटसह ट्रेंडी फीचर्स मिळणार

Samsung फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलेक्सी S22 लाँचिंगसाठी सज्ज, आयफोनपेक्षा लहान, फीचर्स दमदार

256 GB स्टोरेज, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह Realme चा शानदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स

(WhatsApp to give Cashback Feature for Payments, Multiple Features for Group Chats in Works)