Whatsapp : जगात मोठ्या प्रमाणात व्हॉट्सॲप वापरले जाते. भारतात पण याची संख्या मोठी आहे. भारतात सर्वाधिक लोकं जसे डिजीटल पेमेंट करतात त्यापेक्षा अधिक लोकं व्हॉट्सॲप वापरतात. व्हॉट्सअप वापरताना अनेकांकडून आपल्याला मेसेज पाठवले जातात. आपण देखील या माध्यमातून मेसेज पाठवतो. कधी आपण डायरेक्ट मेसेज पाठवतो तर कधी ब्रॉडकास्ट लिस्टच्या माध्यमातून अनेकांना एकाच वेळी मेसेज पाठवतो. व्हॉट्सॲप वापरणं आता सोपं झाले आहे. नवीन नवीन फीचर कंपनी आणत आहे. पण या सोबत ते जितकं सोपं होत जातंय तितकंच ते वापरताना नियम देखील अधिक कडक होत जाणार आहेत.
तुम्ही जर व्हॉट्सअप वापरत असाल आणि नियमांचे उल्लंघन करत असाल तर तुमचे Whatsapp अकाऊंट ब्लॉक केले जाऊ शकते. त्यामुळे व्हॉट्सॲप वापरताना आता खूप काळजी घ्या. याबाबत तुम्हाला खूप सावध राहण्याची गरज आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत. तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट बंद होऊ नये म्हणून तुम्ही याबाबी लक्षात ठेवल्या पाहिजे.
फेब्रुवारीमध्ये व्हॉट्सॲपने भारतात तब्बल 76 दशलक्ष अकाऊंट बंद केली आहेत. ही संख्या खूप मोठी आहे. खोट्या बातम्या पसरवणाऱ्या अकाऊंटवर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच इतर नियम मोडणाऱ्यांवर देखील कारवाई केली जाते.
तुमच्या WhatsApp खात्यावर बंदी घातली जाऊ नये म्हणून तुम्ही स्वयंचलित संदेश पाठवणे टाळले पाहिजे. कोणताही मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी अनेक वेळा विचार करावा. कोणाचाही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कोणतेही मेसेज फॉरवर्ड करू नका. तुम्ही ब्रॉडकास्ट लिस्टचा देखील खूप गांभीर्याने वापर केला पाहिजे.
व्हॉट्सॲपवर आता अनेक सुविधा दिल्या जातात. पण यासोबत काही नियम देखील असतात. त्यामुळे व्हॉट्सॲप वापरताना काळजी घेतली पाहिजे. अन्यथा तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते.
मेटाच्या मालकीचं असणाऱ्या व्हॉट्सॲपवर लवकरच एक नवी फीचर येणार आहे. व्हॉट्सॲपच्या या आगामी फीचरचे नाव लायब्ररी असे असणार आहे. यामुळे व्हॉट्सॲपवर कोणतीही मीडिया फाइल शेअर करणे सोपे होणार आहे.