मेटा कंपनीचे ॲप व्हॉट्सॲपबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. व्हॉट्सॲपने आपल्या या ॲप अपडेट केले आहेत. ज्यामुळे जुने स्मार्टफोन वापरणाऱ्या लोकांच्या मोबाईलमझध्ये व्हॉट्सॲप बंद होणार आहे. CanalTech च्या अहवालानुसार, Samsung, Motorola, Huawei, Sony, LG आणि Apple सारख्या ब्रँडचा समावेश असलेल्या 35 मोबाईल फोन्समध्ये यापुढे WhatsApp अपडेट्स किंवा सिक्युरिटी पॅच मिळणार नाहीयेत.
व्हॉट्सॲपच्या ॲपची कार्यक्षमता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी हा निर्णय घेतलाय. परंतु ॲप अपडेट केल्यानंतर काही युजर फोनवर हे ॲप वापरू शकणार नाहीत. व्हॉट्सॲप वापरण्यासाठी त्यांना नवीन स्मार्टफोन घ्यावा लागेल.
अनेक लोकप्रिय मॉडेल स्मार्टफोनच्या यादीत समाविष्ट आहेत ज्यावर WhatsApp चालणार नाही. Galaxy Note 3, Galaxy S3 Mini आणि Galaxy S4 Mini सारखे Samsung फोन. Motorola चे Moto G आणि Moto. Apple चे अलीकडील मॉडेल जसे की iPhone 6 आणि iPhone SE देखील यापुढे ॲपला सपोर्ट करणार नाहीत. Huawei, Lenovo, Sony आणि LG चे अनेक मॉडेल्स देखील प्रभावित झाले आहेत.
1.सॅमसंग गॅलेक्सी एस प्लस
2.सॅमसंग गॅलेक्सी कोर
3. सॅमसंग गॅलेक्सी एक्सप्रेस 2
4. सॅमसंग गॅलेक्सी ग्रँड
5. सॅमसंग गॅलेक्सी नोट 3
6. सॅमसंग गॅलेक्सी S3 मिनी
7. Samsung Galaxy S4 Active
8.Samsung Galaxy S4 Mini
9.सॅमसंग गॅलेक्सी S4 झूम
10. मोटो जी
11. मोटो एक्स
12. आयफोन 5
13. आयफोन 6
14. iPhone 6S
15. iPhone 6S Plus
16. iPhone SE
17. Huawei Ascend P6 S
18. Huawei Ascend G525
19.Huawei C199
20.Huawei GX1s
21. Huawei Y625
22. लेनोवो 46600
23. Lenovo A858T
24. लेनोवो P70
25. लेनोवो S890
26. Sony Xperia Z1
27. सोनी Xperia E3
28. LG Optimus 4X HD
29. LG Optimus G
30. LG Optimus G Pro
31. LG Optimus L7
WhatsApp ने आपल्या युजर्सच्या सुरक्षेकरीता नवीन सुरक्षा वैशिष्ट्ये प्रदान केले आहे. ॲप सुरळीत चालावे त्यासाठी हे अपडेट करण्यात आले आहे. WhatsApp फक्त Android 5.0 किंवा त्यापुढील आवृत्ती आणि iOS 12 किंवा त्यापुढील आवृत्ती असलेल्या iPhones ला सपोर्ट करेल. याचा अर्थ यापेक्षा जुन्या सिस्टीमवर चालणाऱ्या कोणत्याही फोनला यापुढे महत्त्वाचे अपडेट मिळणार नाहीत.