मुंबई, व्हॉट्सॲपने (WhatsApp) आपल्या यूजर्ससाठी स्क्रीनशॉट ब्लॉकिंग फीचर (Screenshot blocking feature) आणले आहे. युजर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन हे फिचर सादर करण्यात आले आहे. या फीचरची मोठ्याप्रमाणात मागणी होत होती. कंपनी खूप दिवसांपासून याची चाचणी करत होती आणि आता हे फीचर यूजर्ससाठी उपलब्ध करायला सुरुवात झाली आहे. सध्या, हे वैशिष्ट्य काही बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. स्क्रीन ब्लॉकिंग वैशिष्ट्याच्या मदतीने, वापरकर्ते एकदा पहा म्हणून पाठवलेले व्हिडिओ आणि फोटोंचे स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाहीत.
WABetainfo च्या रिपोर्टनुसार, इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने काही बीटा टेस्टर्ससाठी स्क्रीनशॉट ब्लॉकिंग फीचर रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सॲप व्ह्यू वन्स फोटो आणि व्हिडिओची नवीन आवृत्ती रिलीज करणार आहे.
वापरकर्त्याला स्क्रीनशॉट आणि स्क्रीन रेकॉर्डिंग करण्यापासून प्रतिबंधित करून वापरकर्त्यांची गोपनीयता सुधारणे हा त्याचा उद्देश आहे. सध्या, हे वैशिष्ट्य फक्त काही बीटा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. यासाठी यूजर्सला गुगल प्ले स्टोअरवरून व्हॉट्सॲपचे नवीन बीटा व्हर्जन डाउनलोड करावे लागेल.
जर एखाद्या वापरकर्त्याने ‘वन विव्ह’ म्हणून फोटो किंवा व्हिडिओ पाठवला, तर ज्या वापरकर्त्याने स्क्रीनशॉट घेतला आहे त्याला एक मेसेज दिसेल, ज्यामध्ये सुरक्षा धोरणामुळे स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही असे लिहिलेले असेल. इतकेच नाही तर जर एखाद्या यूजरने थर्ड पार्टी ॲपवरून स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला स्क्रीन ब्लॅक दिसेल.
या फीचरचा फरक चॅटिंगवर पडणार नसून तो फक्त विडिओ आणि फोटोसाठी असेल. त्यामुळे वापरकर्ते चॅटिंगचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात.