नवी दिल्ली | 30 सप्टेंबर 2023 : इन्स्टाग्राम आणि फेसबुक प्रमाणेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ने (पूर्वीचे ट्विटर) पण कंटेंट किएटर्सचे नशीब उघडले आहे. मेटा कंपनी तिच्या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर कंटेंट क्रिएटर्सला जोरदार कमाई करुन देत आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) याने गेल्यावर्षी ट्विटर खरेदी केले होते. त्यात बदलांची लडच लावली. अनेक बदल केले. ट्विटरचे नाव, लोगो, कर्मचारी, कार्यालयीन फर्निचरमध्ये मोठे बदल केले. आता मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने कंटेंट क्रिएटर्सला (Content Creators) कोट्यवधी रुपयांची कमाई करुन दिली आहे. X च्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी या पेमेंट खुलासा केला आहे.
अशी झाली कमाई
X च्या सीईओ लिंडा याकारिनो यांची काही महिन्यांपूर्वी एलॉन मस्क यांनी नियुक्ती केली होती. ज्या युझर्सने एक्सवर कंटेंट क्रिएट केला आणि तो लोकांपर्यंत पोहचवला. त्यामुळे एक्स प्लॅटफॉर्मने त्यांना कमाईची संधी मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात क्रिएटर्ससाठी नवीन सेगमेंट सुरु करण्याचे आणि त्यांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत क्रिएटर्स कम्युनिटीसाठी एक्स प्लॅटफॉर्मने जवळपास 20 दशलक्ष डॉलर, भारतीय रुपयात 166 कोटी रुपये दिल्याचे लिंडा यांनी स्पष्ट केले.
X कडून कशी होते कमाई
X हा एक ॲड रेव्हेन्यू प्रोग्राम एलिजिबल क्रिएटर्ससाठी कमाईचा मोका देते. या क्रिएटर्संना जाहिरातीच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. त्यांचा वाटा कंपनी त्यांना देते. कोणताही युझर कंटेंट क्रिएटर्सच्या पोस्टवर जाहिरात पाहतो, तेव्हा त्यापासून होणाऱ्या कमाईचा काही हिस्सा त्यांना देण्यात येतो.
पण या आहेत अटी
क्रिएटर्स X वरुन मॉनिटायझेशनचा फायदा घेऊ शकतात. X च्या रेव्हेन्यू प्रोगामचा वाटेकरी होण्यासाठी काही अटी व शर्तींचे पालन करावे लागते. सर्वात अगोदर तुम्हाला X ब्लू चे (ट्विटर ब्लू) सब्सक्रिप्शन घ्यावे लागते. तीन महिन्यात तुमच्या पोस्टवर कमीत कमी 50 लाख इंप्रेशन मिळणे आवश्यक आहे. याशिवाय कंटेंट क्रिएटर्सचे कमीत कमी 500 फॉलोअर्स असणे आवश्यक आहे.
2024 मध्ये कंपनी असेल फायद्यात
कंपनीच्या सीईओ लिंडा यांनी सांगितले की 2024 च्या सुरुवातीला X प्लॅटफॉर्म फायद्यात असेल. हा प्लॅटफॉर्म फायद्यात राहण्यासाठीचा रोडमॅप तयार करण्यात येत आहे. त्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातून चांगले रिझल्ट हाती येतील असे त्यांनी सांगितले. पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच कंपनीला मोठा फायदा होईल, असा दावा लिंडा यांनी केला.