मुंबई : भारतात या आठवड्यात एक नवीन स्मार्टफोन लॉन्च होणार आहे, जो भारतातील आतापर्यंतचा सर्वात वेगवान चार्जिंग क्षमतेचा फोन असेल. या मोबाईलमध्ये 120W फास्ट चार्जर उपलब्ध असेल. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हा मोबाइल 15 मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकतो. आतापर्यंत या मोबाईलबद्दल अनेकदा लीक्सद्वारे माहिती समोर आली आहे, जी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Xiaomi 11i HyperCharge to launch in India on 6th january)
Xiaomi 11i HyperCharge असे या फोनचे नाव असून हा फोन भारतात 6 जानेवारी रोजी लॉन्च होईल. दुपारी 12 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. लाइव्ह स्ट्रीमिंग पाहणारे लोक अधिकृत वेबसाइटला भेट देऊन हा लाँच इव्हेंट पाहू शकतात. त्याची माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून मिळू शकते.
हा केवळ सर्वात जलद चार्ज होणारा भारतातील पहिला फोन नाही तर MediaTek Dimensity 920 chipset सह येणारा पहिला फोन असेल. दरम्यान, या फोनच्या किंमतीबाबतही माहिती समोर आली आहे. इंडिया टुडे टेकने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, Xiaomi इंडियाचे चीफ बिझनेस ऑफिसर रघू रेड्डी यांनी सांगितले आहे की Xiaomi 11i हायपरचार्जची किंमत 25-30 हजार रुपयांच्या दरम्यान असू शकते. या फोनसोबत 120W फास्ट चार्जर मिळेल.
Xiaomi 11i हायपरचार्ज हा फोन Redmi Note 11 Pro+ चं रीर्ब्रँडेड व्हर्जन असेल. कंपनीच्या मते, आगामी स्मार्टफोन 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. 100W पेक्षा अधिक फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेला हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे. कंपनीचा दावा आहे की 120W हायपरचार्ज सोल्यूशन केवळ 15 मिनिटांत 100 टक्के बॅटरी चार्ज करू शकते.
रिपोर्ट्सनुसार, Xiaomi 11i हायपरचार्ज हा फोन Redmi Note 11 Pro+ चं रीर्ब्रँडेड व्हर्जन असेल आणि त्याच स्पेसिफिकेशन्स सेटसह येईल. चीनमध्ये, Redmi Note 11 Pro+ 120Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शनसह 6.67-इंच AMOLED पॅनेलसह येतो. डिस्प्लेमध्ये होल पंच समाविष्ट आहे ज्यामध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा सेन्सर आहे.
या फोनच्या बॅक पॅनलवर, स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2 मेगापिक्सेलच्या डेप्थ सेन्सरसह 108-मेगापिक्सेलचा प्रायरमी कॅमेरा दिला जाईल.
हा फोन MediaTek Dimensity 920 चिपसेटसह सुसज्ज आहे, जो 8GB LPDDR4x RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेजसह येतो. या फोनची मेमरी मायक्रोएसडी कार्ड सपोर्टद्वारे वाढवता येते. फोन 4500mAh बॅटरीसह येईल जो 120W फास्ट चार्जिंग आउट-ऑफ-द-बॉक्ससह जोडलेला आहे.
फोनच्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यात 5G सपोर्ट, 4G LTE, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, GPS, NFC, USB टाइप-सी पोर्ट, JBL स्टीरिओ स्पीकर्स, साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर यांसारख्या फीचर्सचा यात समावेश आहे.
इतर बातम्या
Vodafone Idea चे Disney+ Hotstar बेनिफिटवाले प्रीपेड रिचार्ज प्लॅन बंद, जाणून घ्या डिटेल्स
सर्वात जलद चार्ज होणाऱ्या Xiaomi 11i HyperCharge ची लाँच डेट जाहीर, किंमत…
फ्लॅगशिप प्रोसेसर, 60MP कॅमेरासह Moto चा शानदार स्मार्टफोन भारतात लाँचिंगसाठी सज्ज
(Xiaomi 11i HyperCharge to launch in India on 6th january)