Foldable Mobile : Xiaomi Fold 2मध्ये वापरला जाणार Samsungचा डिस्प्ले; वाचा, आणखी काय फिचर्स आहेत

| Updated on: Dec 20, 2021 | 1:15 PM

Xiaomiनं गेल्या वर्षी मिक्स लाइनअप अंतर्गत फोल्डेबल फोन लॉन्च केला होता आणि त्याला Mi Mix Fold असं नाव देण्यात आलं होतं. Xiaomiच्या आगामी फोल्डेबल फोनचं नाव Xiaomi Mix Fold 2 असेल. या फोनमध्ये सॅमसंगचा 8.1 UTG डिस्प्ले वापरण्यात येणार आहे.

Foldable Mobile : Xiaomi Fold 2मध्ये वापरला जाणार Samsungचा डिस्प्ले; वाचा, आणखी काय फिचर्स आहेत
शाओमी मिक्स फोल्ड 2
Follow us on

मुंबई : चीनी स्मार्टफोन कंपनी Xiaomiनं गेल्या वर्षी मिक्स लाइनअप अंतर्गत फोल्डेबल फोन लॉन्च केला होता आणि त्याला Mi Mix Fold असं नाव देण्यात आलं होतं. आता फोल्डेबल फोनची वाढती लोकप्रियता पाहता कंपनी मिक्स फोल्डचं अपग्रेड व्हेरियंट आणणार आहे. Xiaomiच्या आगामी फोल्डेबल फोनचं नाव Xiaomi Mix Fold 2 असेल. या फोनमध्ये सॅमसंगचा 8.1 UTG डिस्प्ले वापरण्यात येणार आहे.
नव्या रिपोर्टनुसार, Xiaomiचा आगामी फोल्डेबल स्मार्टफोन IMEI डेटाबेस दरम्यान दिसला. तसेच, या आगामी मोबाइलचा मॉडेल क्रमांक 22061218Cदेखील यादरम्यान दिसलाय.

जून जुलैमध्ये होणार लॉन्च
Xiaomi Mix Fold 2 2022च्या जून किंवा जुलैमध्ये लॉन्च केला जाईल. सर्वात आधी तो चीनच्या बाजारात दाखल होईल, त्यानंतर तो इतर देशांमध्ये लॉन्च होणार आहे. या फोनला जिझान असं प्रातिनिधिक नाव देण्यात आलंय. तसंच, हा फोन अपग्रेड केलेल्या वैशिष्ट्यांसह दिसेल.

सॅमसंगचा डिस्प्ले
कंपनी आपल्या आगामी मोबाइलमध्ये 8.1 इंचाचा UTG AMOLED डिस्प्ले वापरणार आहे. हा डिस्प्ले Samsungचा आहे. UTG डिस्प्लेवर 30 मायक्रॉनवर प्रक्रिया केली जाते. यामुळे टिकाऊपणा वाढतो. Xiaomi Fold 2मध्ये अधिक चांगली वैशिष्ट्ये असतील. इतर फीचर्सबद्दल बोलायचं झालं, तर पुढच्या वर्षी येणाऱ्या Xiaomiच्या फोल्डेबल फोनमध्ये अनेक नवीन डिझाइन्स पाहायला मिळतील. तसंच फिचर्सही अपग्रेड केले जातील. यामध्ये बेझल्स कमी करण्यावर भर असेल.

आधीही वापरलंय हे तंत्रज्ञान
Xiaomiनं फ्लेक्झिबल स्क्रीनसाठी पॉलिमाइड फिल्म वापरलीय, जी मिक्स फोल्डमध्ये दिसली होती. हे तंत्रज्ञान Xiaomiला Huaxing Optoelectronics (TCL CSOT)नं दिलं. हेच तंत्रज्ञान Huaweiच्या Mate X2साठीही वापरलं गेलंय.

ओप्पोनंही लॉन्च केला फोल्डेबल मोबाइल
अलीकडेच Oppoनं आपला पहिला फोल्डेबल फोन लॉन्च केला. Oppo Find In असं या मोबाइलचं नाव आहे. या फोनमध्ये अनेक चांगले फीचर्स देण्यात आलीत. यात 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा एका छोट्या स्क्रीनच्या वर तर दुसरा अनफोल्ड स्क्रीनच्या वर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग या दोन्हीसाठी हे फिचर अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

Mega Block : 18 तासांनंतर आता मध्य रेल्वेचं 72 तासांच्या मेगाब्लॉकचं नियोजन? प्रवाशांचे होणार हाल

Labor Law: 4 दिवस काम, 3 दिवस सुट्टी, पगारही हातात कमी पडणार, नव्या कामगार कायद्यात नवं काय, जूनं काय?

पेन्शनर्ससाठी काउंटडाउन: ‘हे’ प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अवघे 15 दिवस!