मुंबई : डिजिटल युगात युपीआयच्या माध्यमातून दर महिन्याला कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे सर्व्हरवर ताण येऊन सिस्टम डाउन होणं सामान्य झालं आहे.ग्राहकांची अडचण समजून गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एनपीसीआयनं युपीआय लाइट सादर केलं आहे.कमी रक्कम पाठवण्यासाठी युपीआय लाइट हे सर्वात बेस्ट वर्जन आहे. आता पेटीएमनं हे तंत्रज्ञान आपल्या प्लॅटफॉर्मवर सुरु केलं आहे.भारतात पेटीएम हे पेमेंट अॅप बहुतांश युजर्स वापरतात. या माध्यमातून पेमेंट करणाऱ्यांची संख्याही सर्वाधिक आहे.त्यामुळे या नव्या तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे. पेटीएम युजर्संना या सुविधेमुळे पीक ट्रान्सक्शनदरम्यान कोणतीही अडचण भेडसावणार नाही. या माध्यमातून युपीआय लाइट युजर्स एका वेळी 200 रुपयांपर्यंत “Quick and seamless transactions” करू शकतात.पेटीएम वॉलेटमध्ये पेमेंटसाठी कोणताही पिन मागितला जाणार नाही. युजर्स कोणत्याही चार्जशिवाय युपीआय बॅलेंस एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करू शकतात.पेटीएम युपीआय लाईटला सपोर्ट करणारं पहिलं थर्ड पार्टी युपीआय पेमेंट प्लॅटफॉर्म आहे. कंपनीचा दावा आहे की, या अॅपच्या माध्यमातून रियल टाइम ट्रान्सक्शन करु शकता.
सध्या तरी 9 बँका पेटीएम युपीआय लाईटला सपोर्ट करतात. यात कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, इंडियन बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया आणि उत्कर्ष स्मॉलल फायनान्स बँक यांचा समावेश आहे. जे युजर्स पहिल्यांदा साइनअप करतील आणि 1000 रुपये अॅड करतील त्यांना 100 रुपयांचं कॅशबॅक मिळेल.