मुंबई | 23 सप्टेंबर 2023 : कुणाला कशाची क्रेझ असेल काहीच सांगता येत नाही. एखादी गोष्ट मनात बसली की ती मिळवण्यासाठी माणूस जंग जंग पछाडत असतो. मग तो दिवस रात्र, काळवेळ, राज्य देश अहो एवढंच काय तो देशाच्या सीमाही पाहात नाही. ती गोष्ट मिळवण्यासाठी देशाच्या सीमा ओलांडून जाणारेही वेडे बक्कळ आहेत. अशाच एका मोबाईल वेड्याचा किस्सा समोर आला आहे. आयफोन 15 लॉन्च होताच तो खरेदी करण्यासाठी एक पठ्ठ्या थेट गुजरातहून मुंबईत आला. 17 तास रांगेतही थांबला अन् अखेर त्याच्या हाती… काय झालं त्या मोबाईल वेड्याचं?
अॅपलने 13 सप्टेंबर रोजी iPhone 15 सीरीज लॉन्च केली होती. भारतात शुक्रवारी 22 सप्टेंबरपासून आयफोन 15ची विक्री सुरू झाली. अॅपलच्या आयफोन 15 सीरीजची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळेच हा फोन खरेदी करण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत अॅपल स्टोरमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. अॅपलच्या आयफोन 15चं वेड इतकं आहे की एक तरुण हा फोन खरेदी करण्यासाठी थेट गुजरातच्या अहमदाबादहून मुंबईत अॅपल स्टोरमध्ये आला. हा फोन खरेदी करण्यासाठी त्याने दोन तीन नव्हे तर तब्बल 17 तास रांगेत घालवले.
हा फोन खरेदी करण्यासाठी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे अॅपल स्टोरमध्ये मेड इन इंडियाचा पहिला फोन खरेदी करण्यासाठी अहमदाबादहून आलो आहे, असं त्याने सांगितलं. एवढंच नव्हे iphone15 Pro Max खरेदी करण्यासाठी तो अहमदाबादहून विमानाने मुंबईत आला होता. बीकेसीत तो गुरुवारी दुपारी 3 वाजता आला. तो फोन घेण्यासाठी 17 तास रांगेत उभा होता. मी Apple Watch Ultra 2 आणि नव्या Apple AirPods सह व्हाइट टायटेनियममध्ये एक iphone15 Pro Max बुक केला आहे. हा ब्रँड सर्वात चांगला आहे, असं त्याचं म्हणणं आहे.
अमेरिकेत आयफोन 15 ची किंमत 799 डॉलर आणि आयफोन 15 प्लसची किंमत 899 डॉलर आहे. तर iPhone 15 Pro ची किंमत 999 डॉलर आणि iPhone 15 Pro max ची किंमत 1199 डॉलर ठेवलेली आहे. भारतात याची सुरुवात 79, 999 रुपयांपासून आहे. ही किंमत आयफोन 15 सीरीजच्या बेस 128 जीबी मॉडलची आहे.
-डिस्प्ले 6.10 इंच
-प्रोसेसर अॅपल A16 बायोनिक
-फ्रंट कॅमेरा 12 मेगापिक्सल
-रियर कॅमेरा 48 मेगापिक्सल + 12 मेगापिक्सल
-रॅम 8 जीबी
-स्टोरेज 128 जीबी
-ओएस आयओएस 17
-रिझॉल्यूशन 1179×2556 पिक्सल