YouTube वरून कसे कमवाल महिन्याला हजारो डॉलर? काय आहेत अटी? वाचा

| Updated on: Aug 06, 2021 | 12:16 PM

सध्याचा जमाना डिजीटल मिडीयाचा आहे. सध्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर (Social Media) अनेकजण ट्रेन्डिंग आणि माहितीवर विषयांचे व्हिडीओ बनवून पोस्ट करत असतात. देशात असे अनेक युट्युबर्स (YouTubers) आहेत जे युट्युबवर व्हिडीओ कंटेंट तयार करून वर्षाला कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत. जर तुम्हीही व्हिडीओ क्रिएटर (Video Creator) आहात आणि तुम्हालाही युटयुबच्या माध्यमातून पैसा कमवायचा असेल तर […]

YouTube वरून कसे कमवाल महिन्याला हजारो डॉलर? काय आहेत अटी? वाचा
युट्युब शॉर्ट्स
Follow us on

सध्याचा जमाना डिजीटल मिडीयाचा आहे. सध्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर (Social Media) अनेकजण ट्रेन्डिंग आणि माहितीवर विषयांचे व्हिडीओ बनवून पोस्ट करत असतात. देशात असे अनेक युट्युबर्स (YouTubers) आहेत जे युट्युबवर व्हिडीओ कंटेंट तयार करून वर्षाला कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत. जर तुम्हीही व्हिडीओ क्रिएटर (Video Creator) आहात आणि तुम्हालाही युटयुबच्या माध्यमातून पैसा कमवायचा असेल तर युट्युब तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी घेऊन आलं आहे.

या महिन्यापासून युट्युबने काही निवडक देशांमध्ये 100 मिलीयन युट्युब शॉर्ट्स (YouTube Shorts Fund) फंड देण्याची घोषणा केली आहे. हा फंड युट्युबवर शॉर्ट्स व्हिडीओ बनवणाऱ्यांना दिला जाणार आहेत. पण यासाठीची अट म्हणजे तुमचा व्हिडीओ सर्वाधिक व्हायरल झालेला असावा. दर महिन्यात काही युट्युब क्रिएटर्सची निवड केली जाणार आहे. ज्यांना युट्युबकडून व्हिडीओसाठी पैसे दिले जाणार आहेत. या माध्यमातून युट्युबला आपला छोट्या व्हिडीओचा प्लॅटफॉर्म युट्युब शॉर्ट्सला प्रमोट करायचं आहे. त्यासाठी क्रायटेरियामध्ये बसलेल्या क्रिएटर्सना युट्युब बक्कळ पैसे देणार आहे. तुमच्या व्हिडीओच्या व्ह्यूज आणि एंगेजमेंटवरून तुम्ही महिन्याला 100 डॉलर्सपासून ते 10 हजार डॉलर्सपर्यंत कमाई करू शकता. (YouTube Shorts creators can earn upto 10000 Dollers per month with viral videos)

काय आहे युट्युब शॉर्ट्स?

युट्युब शॉर्ट्स हा युट्युबवरच्या कमी कालावधीच्या व्हिडीओंचा फॉरमॅट आहे. यामध्ये जास्तीत जास्त 60 सेकंदांपर्यंत व्हिडीओ तयार करायचा असतो. भारतासह जगभरात टिकटॉक (TikTok) व्हिडीओची क्रेझ निर्माण झाली होती. पण टिकटॉकवर बंदी आणल्यानंतर छोट्या व्हिडीओची बाजारपेठ काबीज करण्यासाठी युट्युबने युट्युब शॉर्ट्स हा फॉरमॅट लॉन्च केला होता. गुगलच्या (Google) दाव्यानुसार युट्यूब शॉर्ट्स अल्पावधितच जगभरात हिट झाला आहे. मार्च महिन्यात युट्युब शॉर्ट्स व्हिडीओची व्ह्युअरशिप दररोज 6.5 बिलियनच्या जवळपास होती. ती आता 15 बिलियनच्या पुढे गेली आहे. हा फॉरमॅट आणखी प्रमोट करण्यासाठी युट्युबकडून 2021 आणि 2022 या दोन वर्षांसाठी 100 मिलीयन युट्युब शॉर्ट्स फंड देण्यात आला आहे.

कसे मिळणार पैसे?

तुम्ही युट्युब क्रिएटर आहात तर तुम्हाला आपल्या युट्युब चॅनेलवर शॉर्ट्स व्हिडीओच्या फॉरमॅटमध्ये व्हिडीओ पोस्ट करायचे आहेत. युट्युबच्या क्रायटेरियामध्ये बसणाऱ्या आणि सर्वाधिक व्ह्युज आणि एंगेजमेट असणाऱ्या व्हिडीओसाठी युट्युब पैसे मोजणार आहे. त्यासाठी तुम्हाला महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बोनस फंडसाठी क्वालिफाय करावं लागेल. त्यानंतर महिन्याच्या 25 तारखेपर्यंत तुम्ही बोनस क्लेम करू शकता. जर तुम्ही तसं केलं नाही तर तुमचा बोनस एक्सपायर होऊ शकतो.

काय आहेत युट्युबच्या अटी?

युट्युब शॉर्ट्स फंड मिळवण्यासाठी तुम्हाला युट्युबच्या काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा शॉर्ट व्हिडीओ हा युट्युब कम्युनिटी गाईडलाईन्स, कॉपीराईट, मॉनिटायझेशनच्या सर्व नियमांमध्ये बसणारा असणं आवश्यक आहे. शिवाय तुमच्या युट्युब चॅनेलवर मागच्या 180 दिवसांत म्हणजे 6 महिन्यांत किमान 1 व्हिडीओ अपलोड झालेला असावा. शिवाय युट्युब क्रिएटरचं वय 13 वर्षे पूर्ण झालेलं असावं. वयाची अट ही अमेरिकेसाठी आहे.

या देशांसाठी आहे युट्युब शॉर्ट्स फंड

सध्या युट्युब शॉर्ट्स व्हिडीओ फंड 10 देशांसाठी देण्यात आला आहे. यामध्ये भारतासह अमेरिका, इग्लंड, ब्राझिल, इंडोनेशिया, जपान, मॅक्सिको, नायजेरिया, रशिया आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. या देशांमध्ये युट्युब क्रिएटर्स या फंडसाठी सध्या प्रयत्न करू शकतात. युट्युबच्या माहितीनुसार येत्याकाळात इतर देशांमध्येही अशाप्रकारे फंड दिला जाणार आहे. (youtube shorts creators can earn upto 10000 dollers per month with viral videos)

 

संबंधित बातम्या :

PHOTO | भारतात केवळ 9 महिन्यांत चीनच्या ‘या’ स्मार्टफोनची 20 लाख युनिटची विक्री

यूट्यूब शॉर्ट्समधून कमावण्याची संधी, दरमहा 10 हजार डॉलर्सची होऊ शकते कमाई

अमेझॉनची डिलिव्हरी आता एका दिवसात, ‘या’ 50 शहरांमध्ये सुरु केली नवीन सेवा