आजकाल शिक्षण घेणं महाग झालंय. महाग यासाठी की शाळेच्या फी, शिकवण्या, पुस्तकं, वह्या हा सगळाच खर्च आता शिक्षणात वाढत चाललाय. महागाई फक्त शिक्षणात नाही सगळ्याच क्षेत्रात या महागाईची झळ बसते. गरीब घरातील मुलांना घर तर चालवायचं टेन्शन असतंच सोबतच चांगलं शिक्षण घेण्यासाठी आटापिटा करावा लागतो तो वेगळा. अशीच एक केरळमधली मुलगी आहे जिचा व्हिडीओ बघून तुम्ही भारावून जाल. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. व्हिडीओ जरी मराठी भाषेतला नसला तरी व्हिडीओ मध्ये नेमकं काय आहे हे आपल्या पर्यंत पोहचतंय. यासाठी कुठल्या भाषेची गरज नाही. सोबतच आपल्याला अभिमानही वाटतो की आपल्याकडे अशीही मुलं आहेत ज्यांना शिक्षणाची ओढ आहे.
केरळमधील 12 वीच्या विद्यार्थिनीने आपले स्वप्न साकार करण्याचा निर्धार केला आहे आणि ती दररोज कठोर परिश्रम घेतीये.
केरळमधील चेरथला मधील विनिशा शिक्षणासाठी खूप मेहनत घेत असून पोटाची खळगी भरण्यासाठीही ती तितकेच प्रयत्न करते. इयत्ता 12 वीची ही विद्यार्थिनी जेव्हा तिचे वर्ग संपतात तेव्हा तिच्या शाळेच्या बाहेरच शेंगदाणे विकते.
विनिशा शाळेनंतर आपली शेंगदाण्याची गाडी बाहेर घेऊन जाते आणि रात्री 8 वाजेपर्यंत शेंगदाणे विकते जेणेकरून तिला शाळा सोडावी लागू नये.
ती गरम पॅनवर मीठात शेंगदाणे भाजते. तिचा हा गाडा परिसरात खूप फेमस आहे. बहिणीच्या लग्नानंतर कुटुंबावर मोठं कर्ज झाल्यानंतर विनिशानं शेंगदाणे विकायला सुरुवात केली.
तिचे वडील मजुरी करतात आणि आईही शेंगदाणे विकणारी आहे. शेंगदाणे विकताना तासनतास उभे राहिल्याने आईच्या पायात वेदना होत होत्या. त्यावेळी विनिशाने स्वत: हा गाडा चालवायचं ठरवलं.
विनिशा गेल्या चार वर्षांपासून आई-वडिलांना मदत करत आहे. एशियन नेटने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विनिशाने सांगितले की, ती संध्याकाळी 4:30 वाजता काम सुरू करते आणि रात्री 8 वाजता संपवते.
शेंगदाणे विकल्यानंतर ती घरी जाऊन अभ्यास करते. ती प्रामाणिकपणे काम करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते तिथून जाणारे लोक तिची चेष्टा कशी करतात. पण तिला आपले उत्पन्न मिळविण्यात आणि अनुभवातून शिकण्यात अभिमान वाटतो.
विनिशाने सांगितले की, ती शाळेनंतर ट्यूशनला जात असे, पण दोन्ही गोष्टी सांभाळणे तिला कठीण होऊ लागलं. मग तिने शेंगदाणे विकण्याचे काम कायम करण्याचा निर्णय घेतला. विनिशा इतर विद्यार्थ्यांना नेहमी स्वतंत्र राहण्याचा आणि उपजीविकेसाठी उत्पन्न निर्माण करण्याचा सल्ला देते.