अनेकदा परीक्षांशी संबंधित गोष्टीही सोशल मीडियावर व्हायरल होतात. मुलांच्या उत्तरपत्रिकेत त्यांची गमतीशीर उत्तरंही समोर येतात, असंही दिसून येतं. नुकतीच एक उत्तरपत्रिका व्हायरल झाली आहे ज्यात एका मुलाने लिहिले आहे की, जर तो समाजसुधारक असता तर देशाचे कोणतेही नुकसान झालं नसतं. एका प्रश्नाच्या उत्तरात त्याने या सर्व गोष्टी लिहिल्या.
महेश्वर पेरी नावाच्या युजरने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. माझ्या पाच वर्षांच्या मुलाने पाचवीच्या परीक्षेत एका प्रश्नाच्या उत्तरात हे सगळं लिहिलंय, अशा आशयाचं कॅप्शन त्याने हा फोटो शेअर करताना दिलंय. यात या मुलाला स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिक कुप्रथांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. प्रश्नात लिहिलं होतं की, जर तुम्ही त्या युगात जन्माला आला असता तर भारताला मागास होण्यापासून रोखण्यासाठी त्या काळी प्रचलित असलेल्या कोणत्या सामाजिक अनिष्टतेचे तुम्ही उच्चाटन केले असते?
या प्रश्नावर पाचवीत असलेल्या या मुलाने उत्तर दिले, “मला विधवा पुनर्विवाह कायदा आणायला आवडेल. एखादी स्त्री विधवा झाली तर ती एकतर सती होऊ शकते किंवा पांढरी साडी परिधान करू शकते, केस बांधून बाहेर जाऊ शकत नाही. जर या विधवांना दुसरं लग्न करता आलं असतं तर त्यांचं आयुष्य आणखी चांगलं झालं असतं.त्यामुळे मी विधवा पुनर्विवाह कायदा आणला असता.
My Son responds to a question in a Class 5 exam paper.. pic.twitter.com/lR7BQASAzQ
— Maheshwer Peri (@maheshperi) March 15, 2023
या मुलाचे हे उत्तर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आणि लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका युजरने लिहिलं आहे की, एवढ्या लहान वयात या मुलाची समज इतकी जास्त आहे की अनेकदा मोठी माणसंही इतकी हुशार नसतात. तर दुसऱ्याने लिहिले की, मुलगाही खूप दयाळू दिसतो. सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.