मुंबई: आजचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही गुगलचा वापर करता का? जरा कल्पना करा, सुमारे 70-80 वर्षांपूर्वी लोकांना प्रश्नांची उत्तरे कशी मिळत असत? ते आधी पुस्तकांमध्ये त्या प्रश्नांचं उत्तर शोधत किंवा संबंधित शिक्षकांकडे जाऊन त्यावर उपाय विचारत असत. सध्याचा काळ बदलला आहे. आता लोक ऑनलाइन क्लासेस, फोन किंवा गुगलचा आधार घेऊन आपली उत्तरे शोधतात. आता शाळांमधील शिक्षणही ऑनलाइनवर आधारित आहे. इतकंच नाही तर प्रोजेक्ट बनवण्याचा ट्रेंडही काही वर्षांपूर्वी आला होता. सुमारे 80 वर्षांपूर्वी 1943 मध्ये एका शाळेची वार्षिक प्रश्नपत्रिका असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हायरल पेपरमध्ये आपण पाहू शकता की हा पेपर कॉमर्सचा आहे आणि त्यात एकूण 10 प्रश्न विचारण्यात आले आहेत. 1943-44 च्या प्रश्नपत्रिकेत एकूण 10 प्रश्नांपैकी 8 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत होती आणि विद्यार्थ्याकडे फक्त अडीच तास असायचे. या प्रश्नपत्रिकेत एकूण 100 गुण असून उत्तीर्ण गुण 33 आहेत. हे जुने प्रश्न पाहिल्यानंतर आजच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसेल. सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही प्रश्नपत्रिका पाहून सुशिक्षित लोकही आश्चर्यचकित होतील. हा फोटो निवृत्त आयएएस अधिकारी बद्रीलाल स्वर्णकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
Look at the standard of #Class_V papers in the half yearly #examination in 1943-44 in #India. The #matric_system has made the system so easy! pic.twitter.com/kMYoP2fgnL
— Badri Lal Swarnkar IAS (Retired) (@BLSwarnkar2) May 2, 2023
निवृत्त आयएएस अधिकाऱ्याने ट्विटमध्ये लिहिले की, ‘1943-44 मध्ये भारतात झालेल्या सहामाही परीक्षेत इयत्ता पाचवीच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा पाहा. या पेपरनुसार आजच्या पाचवीच्या मुलांनी एक-दोन प्रश्नांचीही उत्तरे दिली तर ही मोठी गोष्ट आहे. मात्र सर्व प्रश्न आणि गुण हिंदी भाषेत लिहिलेले आहेत, जे आजच्या युगातील विद्यार्थ्यांना समजणे अशक्य आहे. बहुतेक इंग्रजी माध्यमातील मुले हिंदीत लिहिलेल्या आकड्यांपासून अनभिज्ञ असतात. त्यामुळेच त्यांना याचे उत्तर कळणे शक्य होत नाही. हा पेपर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.