जगात लक्झरी कारची आवड असणारे लोक तुम्ही पाहिले असतीलच, पण या छोट्या कारप्रेमी मुलाबद्दल जाणून घेताना तुम्हाला धक्का बसेल, हा मुलगा खूप संपत्तीचा मालक आहे. हाजिक नासरी नावाच्या एका मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हाजीकने व्हिडिओमध्ये लँबोर्गिनी (Lamborghini) आणि रेंज रोव्हर (Land Rover) सारख्या अनेक कारसह आपला लक्झरी कारचा ताफा दाखवलाय. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, मलेशियात राहणारा हाजिक नासरी हा फक्त 14 वर्षांचा आहे. या सर्व गाड्या आपण स्वत:च्या पैशातून विकत घेतल्याचं हाजिक सांगतो. हाजिकने सांगितले की, तो 12 वर्षांचा असताना त्याने Range Rover Sport Autobiography खरेदी केली होती, ज्याची किंमत आज सुमारे 2 कोटी रुपये आहे.
हाजिकच्या म्हणण्यानुसार, हे पैसे त्याच्याकडे बिटकॉइनमधून आले आहेत. हे सर्व पैसे त्याने क्रिप्टो मार्केटमधून कमावले आहेत.
हाजिक क्रिप्टो गुंतवणूकीमध्ये सक्रियपणे भाग घेतो. तो म्हणतो की, जेव्हा तो 10 वर्षांचा होता तेव्हा त्याने आपल्या आयुष्यातील पहिली कार खरेदी केली होती.
क्रिप्टो मार्केटमधील तेजीचा फायदा उठवू शकलेल्या तरुणांपैकी हाजिक एक आहे. हाजिकने या वाहनांचे कलेक्शन टिकटॉक पोस्टच्या माध्यमातून लोकांना दाखवले.
हाजिक म्हणतो की त्याने चार वर्षांत अनेक महागडी वाहने खरेदी केली आहेत. भविष्यात Chevrolet ची Camaro विकत घेण्याची त्याची योजना आहे.
हाजिकला टिकटॉकवर ४४ हजारांहून अधिक लोक फॉलो करतात आणि त्याने शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 56 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.