बाईईई…हा काय प्रकार! ४ लग्न, २ गर्लफ्रेंड्स, १० मुलांचा बाप अन् आता पठ्ठ्याला बनायचे आहे ५४ मुलांचे वडील

| Updated on: Oct 20, 2024 | 12:37 PM

ना नोकरी, ना व्यवसाय तरीही 4 लग्न, 2 गर्लफ्रेंड्स असलेल्या पठ्ठ्याचा विचित्र हट्ट. 36 वर्षीय तरुणाला ५४ मुलांचा बाप होऊन करायचा आहे जगावेगळा रेकॉर्ड

बाईईई...हा काय प्रकार! ४ लग्न, २ गर्लफ्रेंड्स, १० मुलांचा बाप अन् आता पठ्ठ्याला बनायचे आहे ५४ मुलांचे वडील
Ryuta Watanabe
Follow us on

बऱ्याच जणांना वेगवेगळ्या पद्धतीचे रेकॉर्ड करण्याची आवड असते. कोणी खाण्याचा रेकॉर्ड करतं तर कोणी पोहण्याचा, तर कोणी धावण्याचा ,पण एका तरुणाला चक्क ५४ मुलांचा बाप होण्याचा रेकॉर्ड करायचा आहे. हे ऐकूण कोणालाही धक्काच बसेल पण हे खरं आहे. एका ३६ वर्षाच्या युवकाला चक्क ५४ मुलांचे वडील बनण्याची इच्छा आहे.

ना नोकरी, ना व्यवसाय; उदरनिर्वाह बायको अन् मैत्रिणींच्या कमाईवर

जपानच्या होक्काइडो येथे राहणारा ३६ वर्षीय तरूण रयुता वातानाबे याच्याबद्दल सध्या सगळीकडेच चर्चा आहे. रयुताचं हे रेकॉर्ड करण्याचं वेड जगभर पसरलं आहे. मुळात म्हणजे रयुता कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय करत नाही. त्याचा उदरनिर्वाह हा सर्वस्वी त्याच्या पत्नी आणि मैत्रिणींच्या कमाईवर अवलंबून आहे. त्याला चार बायका आणि दोन मैत्रिणी आहेत. जपानमध्ये बहुपत्नीत्व कायदेशीररित्या प्रतिबंधित आहे, त्यामुळे रयुता एकाच वेळी अनेक लोकांशी विवाह करू शकत नाही.

हे सुद्धा वाचा

रयुताच्या ‘बायका’ दीर्घकाळ एकत्र राहिल्यामुळे कायद्याच्या दृष्टीने भागीदार मानल्या जातात. रयुता हा १० मुलांचा बाप झाला आहे आणि आता त्याला आपल्या देशातील सर्वाधिक मुलांचे वडील बनून एक विक्रम करायचा आहे. त्याला ५४ मुलांचे वडील बनायची इच्छा असल्याचं म्हटले जाते.

स्वयंपाकापासून ते मुलांची काळजी, रयुता सगळी कामे करतो

पत्नी नोकरीवर गेल्यावर तो स्वयंपाक करतो, सर्व घरकाम पाहतो. एवढंच नाही तर मुलांची काळजीही घेतो. त्याचा जो काही खर्च आहे तो सगळा त्याच्या पत्नी आणि मैत्रिणी मिळून उचलतात. वतनबेचं म्हणणे आहे की तो रोज रात्री वेगळ्या ‘बायको’ सोबत असतो. त्याने असाही दावा केला आहे की,तो आठवड्यातून २८ पेक्षा जास्त वेळा शारिरीक संबंध ठेवतो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे याची त्याच्या पार्टनरला कोणतीही अडचण होत नाही.रयुताला त्याच्या देशातील सर्वात जास्त मुलांचे वडील बनायचे आहे आणि स्वतःला ‘लग्नाचा देव’ बनवायचे आहे. त्याने ५४ मुले हवी असल्याचा विक्रम करायचा आहे कारण  त्याला त्याचे नाव इतिहासात कोरले जावं अशी इच्छा आहे.

रयुताची विक्रम करण्याची पद्धत आणि विषय दोन्ही थोडे विचित्रच आहेत, पण सध्या चर्चा मात्र या पठ्ठ्याच्या जगावेगळ्या विक्रमाचीच आहे. आपला हा विक्रम पूर्ण करण्यासाठी रयुता आता नेमके काय प्रयत्न करेल हे त्यालाच माहित. पण असा विचित्र विक्रम करण्याची इच्छा व्यक्त करणारा बहुधा हा पहिलाच व्यक्ती असावा.