आई आणि मुलाचे नातं खूप सुंदर असते. कोणतीही आई किंवा मूल एकमेकांशिवाय जगू शकत नाही. असे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप दिसतात. काही दिवसांपूर्वी देखील एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात एक हत्तीचं पिल्लू त्याच्या आईपासून वेगळं होतो. प्रत्येकाला हा व्हिडिओ खूप आवडला आणि व्हिडिओ पाहून लोक खूप भावूक झाले. आता अजून एक फोटो समोर आला आहे, ज्यात हत्ती बचाव पथकाला मिठी मारत आहे. ( A child of a small elephant was seen hugging the person of the rescue team the picture is going viral)
व्हायरल होत असलेल्या फोटोत, बचाव पथकाचा एक अधिकारी आरामात उभा आहे आणि त्याच्या जवळ एक छोटा हत्ती देखील दिसत आहे. विशेष गोष्ट म्हणजे हत्ती त्याच्या सोंडेने अधिकाऱ्याला मिठी मारत आहे. हा फोटो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो IFS परवीन कासवानने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, जो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे – प्रेमाला कोणतीही भाषा नाही… हत्तीचं पिल्लू वनपरिक्षकाला मिठी मारत आहे… टीमने या पिल्लाला वाचवले आणि आईशी त्याची ओळख करून दिली.
Love has no language. A baby elephant hugging a forest officer. The team rescued this calf & reunited with mother. pic.twitter.com/BM66tGrhFA
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) October 14, 2021
आता हजारो लोकांना हा फोटो आवडला आहे. नेटकऱ्यांनी शेकडो कमेंट्स देखील केल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करताना लिहिले, ‘हे हत्तीचे पिल्लू खूप गोंडस आहे’ दुसऱ्याने लिहिले, ‘मी याचा आणखी एक व्हिडिओ पाहिला आहे, ज्यात हे पिल्लू त्याच्या आईला भेटतं.’ याशिवाय, बहुतेक युजर्स इमोजीज वापरुन आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
IAS अधिकारी सुप्रिया साहू यांनी जुना व्हिडिओ
दरम्यान, व्हायरल होणारा जुना व्हिडिओ आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता, त्यानंतर हा व्हिडिओ इतर सोशल मीडिया पेजवर दिसला. त्या व्हिडिओमध्ये वन विभागाचे अनेक अधिकारी जंगलात दिसत होते. त्यांच्यासोबत एक हत्ती पिल्लूही चालत होतं. व्हिडिओमध्ये ते सर्व अधिकारी हत्तीच्या पिल्लाला मदत करत होते.
A kutty baby elephant was reunited with the family after rescue by TN foresters in Mudumalai. Most heartwarming indeed. Kudos ?? #TNForest #elephants #mudumalai pic.twitter.com/eX9gBd3oK7
— Supriya Sahu IAS (@supriyasahuias) October 6, 2021
खरंच, हे हृदयद्रावक आहे. या व्हिडिओमध्ये हत्तीचं पिल्लू खूप वेगाने धावत आहे. त्या व्हिडिओवर लोकांच्या बर्याच प्रतिक्रिया देखील दिसल्या. एकानं म्हटलं लिहिले – खूप गोंडस पिल्लू. वन अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे वन्य प्राणी जिवंत आहेत, अन्यथा शिकारी त्यांना कधीच मारतील? त्याचवेळी, दुसऱ्याने लिहिले – हा खरोखर एक चांगला व्हिडिओ आहे.