मायकेल जॅक्सन (Michael Jackson) ला कोण ओळखत नाही? प्रसिद्ध पॉप गायक आणि डान्सर होता, जो आपल्या गाण्यांनी जगाला मंत्रमुग्ध करत असे, तसेच आपल्या डान्सने नाचवत असे. मात्र, त्याचा डान्स कुणीही कॉपी करेल इतका सोपा नव्हता. त्यांची प्रत्येक स्टेप अशी होती की डान्सर्सना घाम फुटायचा आणि आजही असेच काहीसे आहे. आजही त्याच्या डान्स स्टेप्स प्रसिद्ध आहेत ज्या स्टेप्समध्ये डान्स स्टेप्समध्ये मून वॉक (Moon Walk Dance Steps), क्रॉच ग्रॅब, स्पिन आणि फूट शफल इत्यादींचा समावेश आहे. मायकेल जॅक्सन या स्टेप्स अगदी आरामात करायचा पण बाकीच्या डान्सर्सना ते करताना खूप अडचणी येतात. पण एका कुत्र्याने (Dog Viral Video) ते करून दाखवलंय! मायकेल जॅक्सनला कॉपी केलंय काय बेस्ट कॉपी केलंय एकच नंबर…तुम्हीच बघा!
Dog dances to MJ-Billie Jean..???️
हे सुद्धा वाचा?:tt/dobermanvega pic.twitter.com/mAnndp5XMV
— ?o̴g̴ (@Yoda4ever) August 16, 2022
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, टीव्हीवर मायकल जॅक्सनचा डान्स सुरू असून एक कुत्रा त्याच्या डान्सची कॉपी करताना दिसत आहे. मायकेल जॅक्सन जेव्हा फिरतो तेव्हा कुत्राही त्याच्याकडे पाहून गोल फिरतो. मून वॉक बघत असताना कुत्राही त्या स्टाइलची कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. कुत्र्याच्या अनोख्या डान्स स्टेप्स पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कुत्र्यांशी संबंधित विविध प्रकारचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, पण कुत्रा असा नाचताना तुम्ही क्वचितच पाहिला असेल. हा मायकल जॅक्सन डान्स पाहून तुम्हाला आनंदही होईल आणि आश्चर्याचा धक्काही बसेल.
हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Yoda4ever नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. 38 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 7 लाख 33 हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, तर 25 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. त्याचबरोबर लोकांनी व्हिडिओ पाहून विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काहींनी कुत्र्याचे वर्णन ‘हुशार’ असे केले आहे, तर काही जण हसत हसत ‘तो मून वॉक करण्याचा प्रयत्न करीत आहे’, असे म्हणत आहेत.