तुम्ही रस्त्यावरून चालत असाल आणि कारचालकाने (Car Driver) चुकून रस्त्यावरील पाणी तुमच्या अंगावर उडवले तर तुम्ही काय कराल? तुम्हाला गाडीच्या चालकाचा राग येईल किंवा तुम्ही भांडाल. पण कारचालकाला धडा शिकवण्यासाठी या माणसाने जे काही केले ते ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसू शकतो. प्रत्यक्षात एका कारने या व्यक्तीवर रस्त्यावरचे पाणी उडवले (Splashesh Water), त्यामुळे तो संतापला आणि चालकाला धडा शिकवण्यासाठी पोलिसांना (Police) बोलावले. हे प्रकरण इथेच थांबलं नाही, तर त्याने पोलिसांना एक बनावट गोष्ट सांगितली आणि त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. मात्र तपासात सत्य समोर आल्यावर याच व्यक्तीला अटक करण्यात आली.
हे संपूर्ण प्रकरण दिल्लीतील मुंडकाचे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जुलै रोजी मुंडका पोलीस ठाण्यात पीसीआर कॉल आला होता, ज्यामध्ये फोन करणाऱ्याने सांगितले की, एका कार चालकाने त्याला बंदूक दाखवली आणि तो पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा फोन करणारा गायब होता. ज्याने फोन करून तक्रार केली त्याचा फोन सुद्धा बंद होता.
पोलिसांनी त्याला फोन केला पण त्याचा फोनही बंद होता. हे प्रकरण शस्त्राशी संबंधित होतं, त्यामुळे पोलिसांनी तपासासाठी एक पथक तयार केलं. पोलिसांनी कारचालक तसेच फोन करणाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान, 23 जुलै रोजी फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव अरविंद असे असून तो सुलेमान नगर येथील रहिवासी होता हे समोर आलं. त्यानंतर या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं. अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, तो दुचाकीवरून ऑफिसला जात असताना एका कारने त्याच्यावर रस्त्यावर पाणी उडवले आणि तो निघून गेला. यामुळे त्याला राग आला आणि कारचालकाला धडा शिकवण्यासाठी त्याने पीसीआरला फोन करून पोलिसांना खोटी गोष्ट सांगितली आणि फोन बंद केला.