Video | मांजरींना कुशीत घेऊन झोपणाऱ्यांनो, हा वनरक्षक बघा! चक्क बिबटेच वनरक्षकाच्या कुशीत शिरले

| Updated on: Jan 17, 2022 | 2:53 PM

Leopard : कुमार यांनी केलेल्या दाव्यानुसार बिबट्याचं हे कुटुंब दररोज या वनरक्षकासोबत रात्री झोपायचं. पण खरंच असं आहे का, याचा शोध घेण्यासाठी अखेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले.

Video | मांजरींना कुशीत घेऊन झोपणाऱ्यांनो, हा वनरक्षक बघा! चक्क बिबटेच वनरक्षकाच्या कुशीत शिरले
ट्विटर व्हिडीओमधील Screenshot
Follow us on

बिबट्या (Leopard) म्हटलं की सगळ्यांना हल्ली धडकीच भरते. बिग कॅट असलेल्या बिबट्याचे मानवी वस्तीत घुसण्याचे, माणसांवर हल्ला करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत लक्षणीय प्रमाणात वाढलेले आहेत. त्यामुळे मुंबईतील आरे असो किंवा मग नाशकातील काही परिसर.. बिबट्याचा वावर ही धडकी भरवणारी गोष्ट असते. पण कल्पना करा, एक दोन नव्हे तर चक्क बिबट्याचं अख्ख कुटुंबच्या कुटुंब वन रक्षकासोबत त्याच्या कुशीत येऊन झोपत असेल, तर आश्चर्य वाटणार नाही? निश्चितच वाटेल. म्हणून नुकत्याच हाती आलेल्या एका सीसीटीव्ही व्हिडीओत दिसून आलेलं वन अधिकाऱ्याचं आणि बिबट्याचं बॉन्डिंग अनेकांना चकीत करतंय. Ir.Kumar यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याचा व्हिडीओ (Twitter Video) शेअर केलाय. हा व्हिडीओ आतापर्यंत तब्बल सहा मिलियन लोकं (6 Million Views) पाहून झाली आहेत.

15 जानेवारी रोजी हा व्हिडीओ कुमार यांनी आपल्या आयफोनवरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ नेमका कोणत्या वन विभागातला आहे, हे अद्याप कळू शकलेलं नाही. दरम्यान, हा व्हिडीओ प्राणी मित्रांना खूपच भावतोय.

व्हिडीओ मागची गोष्ट

बिबट्याचं अख्ख कुटंब एका वन रक्षकासोबत झोपल्याचं व्हिडीओ दिसतंय. कुमार यांनी केलेल्या दाव्यानुसार बिबट्याचं हे कुटुंब दररोज या वनरक्षकासोबत रात्री झोपायचं. पण खरंच असं आहे का, याचा शोध घेण्यासाठी अखेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. त्यात जे कैद झालंय, ते पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. वन रक्षक झोपलाय. त्याच्या पुढ्यात काही बिबटेही निपचित पडले आहेत. दरम्यान, एक बिबट्या उठतो आणि वनरक्षकाच्या कुशीत जाऊन बिलगतो. काही वेळानं दुसराही बिबट्या उठतो आणि वन रक्षकाच्या पायाजवळ जाऊन डुलकी काढतो. बघता बघता तिसराही बिबट्या उठतो आणि दोन्ही बिबट्यांच्या मधे कसा बसा जागा करुन वन रक्षकाच्या कुशीत घुसण्याचा प्रयत्न करतो आणि झोप काढतो.

पाहा व्हिडीओ –

वनरक्षकही सर्व बिबट्यांना बिलगून निवांत झोपल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. या व्हिडीओमुळे अत्यंत खतरनाक असणारा बिबट्या हा माणसावर किती निरपेक्ष प्रेम करु शकतो, हे अधोरेखित झालं आहे. या वनरक्षकामधील आणि बिबट्यांमधील नातं हे अतुलनीय असल्याचं काही युजर्सनी म्हटलंय.

संबंधित बातम्या :

आंबेगावात बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करत पडला फडश्या; घटना CCTV मध्ये कैद

VIDEO : अंगावर काटा आणणारा व्हिडीओ! चक्क एका मुलीने घेतली चित्त्याची किस्स…व्हिडीओ पाहून अवाक व्हाल

बिबट्याकडून मांजरीचा पाठलाग, धावाधाव सुरु असताना दोघेही विहिरीत पडले आणि सर्व संपलं