भारतात लग्न (Marriage In India) करणे म्हणजे एक मोठा सण आहे. इथे लग्न म्हणजे दोन लोकांचं नाही दोन कुटुंबाचं असतं. गोंधळ पाहावा तर लग्नांनी! आपोआप इथे दोन गट होतात. एक वर पक्ष आणि एक वधू पक्ष. या दोन्ही पक्षांमध्ये लग्नात प्रचंड चढाओढ असते. ही चढाओढ फारच ठराविक काळासाठी असते. एकदा लग्न पार पडलं की अशा गोष्टी कुणी लक्षात देखील ठेवत नाही अशी असते ही चढाओढ. अशीच एक घटना एका लग्नात घडलीये. खरं तर ही चढाओढ नाही भांडणच आहे. एका लग्नातला मारामारीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. हा व्हिडीओ केरळमधला आहे. लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी (Groom) जेवताना पापडाची डिमांड (Demand In Marriage) केली. पापड मिळाला नाही म्हणून मारामारी केली. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल झालाय. एका पापडामुळे व्हायरल झालेला हा व्हिडीओ, लोकांना हे बघून हसावं की रडावं असं झालंय.
ही घटना अलाप्पुझा जिल्ह्यात घडलीये. नवरदेवाच्या मित्रांनी आणखी पापड मागितले, त्यांना नकार दिला गेला. वाद फक्त इतकाच होता.
पापड न मिळाल्यामुळे सुरुवातीला आपापसात शाब्दिक वाद सुरू झाला. थोड्याच वेळात शाब्दिक वादाचं रूपांतर मारामारीत झालं.
ही सगळी नवरदेवाची मित्रमंडळी होती. जे काही घडलं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
वाद इतका टोकाला गेला की अखेर पोलिसांना या प्रकरणात येऊन हस्तक्षेप करावा लागला. ऑनलाईन व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये लग्नाच्या वातावरणात कसा गोंधळ माजतोय हे पाहायला मिळत आहे.
In the great 100% literate state of Kerala, a fist fight broke out at a wedding after friends of the bridegroom demanded papad during the feast. This triggered a verbal spat and ended up in an ugly brawl. No wonder Mallus belo papad. ? pic.twitter.com/HgkEUYMwfy
— Rakesh Krishnan Simha (@ByRakeshSimha) August 29, 2022
लग्नाच्या हॉलमध्ये दोन गट एकमेकांशी भांडत असतात, लोक एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारत दिसतायत.
हे भांडण इतकं टोकाला जातं की बॉक्सिंगच नव्हे तर खुर्च्या आणि टेबलही एकमेकांवर भिरकावली जातायत.
काही लोक डायनिंग टेबलजवळ ठेवलेल्या बादल्यांनीही एकमेकांना मारतात.
ही क्लिप एका युजरने ट्विटरवर शेअर केली आहे, ज्यात लिहिले आहे की, “100 टक्के साक्षर केरळ राज्यात, एका लग्नात भांडण झाले जेव्हा वधूच्या मित्रांनी मेजवानीदरम्यान पापडची मागणी केली होती.”