पाटणा : काही लोकांची स्वप्नं अपूर्ण राहतात, कारण त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसते. मात्र, काही लोक असे असतात की जर त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला असेल तर ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यावर विश्वास ठेवतात. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते कुठल्याही थराला जायला तयार असतात. अशावेळी जर स्वप्न एखाद्या खेड्यातील मुलीचे असेल तर ते अधिकच अवघड होऊन बसते. नुकतंच एक अशी घटना समोर आली आहे, ज्याबद्दल जाणून तुम्ही अवाक व्हाल.
बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात एक प्रकार समोर आला आहे, ज्याची माहिती होताच लोक या मुलीचं कौतुक करत आहेत. मुझफ्फरपूर जिल्ह्यातील बोचाहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून एक मुलगी घर सोडून दिल्लीला पळून गेली, पण तिच्या कुटुंबीयांना वाटले की, आपल्या मुलीचे कोणीतरी अपहरण केले आहे.
पण मुलीने खरं तर याच काळात तिने आपले शिक्षण पूर्ण केले आणि आता ही मुलगी दिल्ली पोलिसांत कॉन्स्टेबल बनली आहे.
चार वर्षांपूर्वी 2018 मध्ये तिच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात अपहरणाची एफआयआर दाखल केली होती, पण ही मुलगी दिल्लीत शिकली आणि दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल बनली. यानंतर सर्वजण तिचे कौतुक करत आहेत आणि तिची स्तुती करत आहेत.
खरं तर 2018 साली वडिलांना आपल्या मुलीचं लग्न करायचं होतं, कारण त्यांचं कुटुंब खूप गरीब होतं. त्यामुळे त्यांना आपल्या मुलीचं लग्न वेळेवर करायचं होतं, पण त्या मुलीला लग्न करायचं नव्हतं.
गरिब परिस्थिती पाहून तिला काहीतरी करून दाखवायचं होतं. याच कारणामुळे ती पळून गेली आणि दिल्लीत राहू लागली. दिल्लीत राहून त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्यांची दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली आहे. ती सध्या प्रशिक्षणात आहे.