भारतात टॅलेंटची कमी नाही. इथे भरभरून टॅलेंट आहे. इथे डान्स सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. भारतात तर जिथे सगळ्याच गोष्टी डान्सने साजऱ्या केल्या जातात अशा ठिकाणी एकसे बढकर एक व्हिडीओ समोर येत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये एका मुलीने खरोखरच आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक मुलगी रस्त्यावर सायकल चालवताना दिसेल. पण आश्चर्य म्हणजे ती आपले दोन्ही हात सोडून सायकल चालवत आहे.
इतकंच नाही तर तिच्या डोक्यावर एक कलशही आहे. सर्वात आधी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा भन्नाट व्हिडिओही तुम्ही पाहाच…
Cycling pedaling with a Kalash on the head as well as doing dance moves by hand. All the time he has to balance the bicycle without touching the handlebar.. It must be really hard. Wonderful !!#Indian #woman #power ??#नवरात्रि_की_हार्दिक_शुभकामनाएं #Navratri pic.twitter.com/7kFexc50jN
— Santosh Sagar (@santoshsaagr) September 30, 2022
ही मुलगी डोक्यावर कलश घेऊन सायकलिंग तर करत आहेच पण शास्त्रीय नृत्यही करत आहे. मुलीला अशा प्रकारे नाचताना पाहून लोक हैराण झालेत.
हा व्हिडिओ पाहून अनेक जण या मुलीचं कौतुक करताना दिसले. या व्हिडिओने अनेक लोकांचे भरपूर मनोरंजन केलंय. अवघ्या 21 सेकंदाचा हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे.
इतकंच नाही तर अनेकांनी हा व्हिडिओ लाईक करून रिट्विटही केला आहे. कमेंट सेक्शनमध्ये काही लोक मुलीला कॉन्फिडन्ट तर काही रिस्क टेकर्स असं म्हणताना दिसतायत.