आजकाल सोशल मीडियाचा खूप ट्रेंड आहे. मुलं असोत वा मोठी, प्रत्येकजण त्याचा चांगला वापर करतो. त्यामुळेच लोकांमध्ये रोज कुठला ना कुठला कंटेंट चर्चेत राहतो. अनेकदा फेसबुक, व्हॉट्सॲप किंवा इतर कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवर काही ना काही व्हायरल होतं. पण अनेक वेळा अशा पोस्ट आपल्या डोळ्यासमोर येतात ज्या पाहून आपल्यालाच शॉक बसतो. अशाच एका पोस्टचीही सध्या चर्चा आहे
जगभरात दरवर्षी 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो. या दिवशी सांताक्लॉज घरोघरी जाऊन मुलांना भेटवस्तू, चॉकलेट्स देतात.
नाताळ आला की मुलंही सांताक्लॉजची वाट बघतात. सांताक्लॉजकडून गिफ्टची मागणी करणारी अनेक मुलं आहेत, पण आजकाल एका मुलीचं पत्र व्हायरल होतंय. ज्यात त्याने सांताक्लॉजला पत्र लिहून असे गिफ्ट मागितले की ते वाचल्यानंतर तुमचे डोळे पाणावतील.
व्हायरल होणाऱ्या या पत्रात लिहिलं आहे की, ‘सांता ख्रिसमसच्या दिवशी माझ्यासाठी गिफ्ट म्हणून खूप पैसे घेऊन ये कारण माझ्या आई-बाबांना त्यांची गरज आहे. रोजचा घरखर्च आणि कर्जाच्या ईएमआयमुळे ते त्रस्त आहेत. जे पाहून मला खूप वाईट वाटतं. सांता, माझी ही इच्छा तू पूर्ण करशील का प्लीज…!”
My Sister has just found this letter to Santa, written by her 8 year old Daughter. It’s made me cry a lot to think that someone so young is even thinking about this! ? pic.twitter.com/GT4c5i8O3Q
— Nicole Connell (@BradsMrs) November 24, 2022
@BradsMrs नावाच्या एका अकाऊंटने हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. “माझ्या बहिणीला हे पत्र सांताकडून मिळाले आहे… हे मूल फक्त आठ वर्षांचे आहे आणि हे सर्व पाहिल्यानंतर मला आश्चर्य वाटते की, इतक्या लहान वयात कोणी इतका विचार कसा करू शकतो.”
सोशल मीडियावरील ही पोस्ट लोकांच्या पसंतीस उतरत आहे. याच कारणामुळे अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या. एका युझरने सांगितले की, आजकाल मुले अगदी लहान वयातच हुशार होतात.