Power Of Unity: “एवढुसा तो जीव” जेव्हा आईस्क्रीमची कांडी उचलतो, तेव्हा…व्हिडीओ व्हायरल होतो!

| Updated on: Aug 27, 2022 | 5:06 PM

मुंग्यांमध्ये आश्चर्यकारक शक्ती असते. काहीही असो कितीही जड असो टीमवर्क करून त्या ती गोष्ट घरी घेऊन जातात. आता सोशल मीडियावर या लहानश्या प्राण्याचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Power Of Unity: एवढुसा तो जीव जेव्हा आईस्क्रीमची कांडी उचलतो, तेव्हा...व्हिडीओ व्हायरल होतो!
Viral Video
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंग्या (Ant) खूप मेहनती असतात. लहानपणी त्याच्या ताकदीशी आणि मेहनतीशी संबंधित कथाही तुम्ही ऐकल्या असतील. एक म्हण आहे – जर तुम्हाला कठोर परिश्रम शिकायचे असतील तर मुंग्यांपासून शिका. तांदूळ किंवा साखरेचा दाणा उचलायला मुंग्यांना किती वेळ जातो? मधल्या फळीतील मुंग्यांची रांग समजा काही कारणाने बिघडली, तर ती न थांबता, टीमवर्कचा (Teamwork) उत्तम आदर्श घालून कामात गुंतलेली असते. मुंग्यांमध्ये आश्चर्यकारक शक्ती असते. काहीही असो कितीही जड असो टीमवर्क करून त्या ती गोष्ट घरी घेऊन जातात. आता सोशल मीडियावर या लहानश्या प्राण्याचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

व्हिडीओमध्ये प्रत्येकासाठी हा महत्त्वाचा धडा

व्हिडिओमध्ये मुंग्यांचा एक ग्रुप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आइस्क्रीमच्या कांड्या घेऊन जाताना दिसत आहे. पाहिले तर ही कांडी
त्यांच्या वजनापेक्षा सुमारे 50 पट जड असते. पण टीमवर्कच्या माध्यमातून मुंग्यांनी आइस्क्रीमची कांडी सहज घेतली आणि एकतेत किती ताकद आहे हे सांगितलं. या एका व्हिडीओमध्ये प्रत्येकासाठी हा महत्त्वाचा धडा दडलेला आहे. या क्लिपमधून ती इंग्रजी म्हण आठवते, ‘युनायटेड वी स्टँड, डिव्हायडेड वी फॉल’.

पाहा व्हिडिओ

#PowerOfUnity

हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. दोन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओला ट्विटरवर हॅशटॅग #PowerOfUnity आणि कॅप्शन देण्यात आले आहे की, “एकजुट होकर तो हम पहाड़ हिला सकते हैं…” हा व्हिडिओ पाहून कुणी मजेशीर कमेंट करत आहे, तर कुणी एकीची ताकद सांगत आहे.

मुंगीचा मेंदू कीटकांमध्ये सर्वात वेगवान

जगभरात मुंग्यांच्या 10 हजारांहून अधिक प्रजाती आहेत! आकारात मुंग्या 2 ते 7 मिलिमीटरच्या दरम्यान असतात. सर्वात मोठ्या मुंगीला कार्पेंटर मुंगी म्हणतात, ज्याचे शरीर सुमारे 2 सेंटीमीटर मोठे असते. मुंगी आपल्या वजनापेक्षा 20 पट जास्त वजन वाहून नेऊ शकते. आणि हो, मुंगीचा मेंदू कीटकांमध्ये सर्वात वेगवान मानला जातो, ज्यात मेंदूच्या सुमारे 2,50,000 पेशी असतात.