नवी दिल्ली : शॉपिंगची लहर प्रत्येकालाच येते. बाजारात जाऊन विविध प्रकारचे, स्टाईलचे कपडे, एक्सेसरीज, दागिने, बुट, शूज वा इतर खरेदी आपण करतोच. पण सध्या एका हँडबॅगची (Smallest luxury Bag ) आणि तिच्या किंमतीची सध्या चर्चा रंगली आहे. काही दिवसांपासून समाज माध्यमांवर एका अत्यंत छोट्या बॅग व्हायरल होत आहे. तिचे फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. कारण ही हँडबॅग साध्या डोळ्यांनी पाहता येत नाही. त्यासाठी मायक्रोस्कोपची गरज लागते. आता या बॅगचा कशासाठी वापर होणार, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पण त्याहून सर्वच अवाक झाले आहे, ते या हँडबॅगची किंमत ऐकून..
मीठाच्या दाण्यापेक्षा छोटी
ही हँडबॅग मीठाच्या दाण्यापेक्षा पण छोटी आहे. पण चर्चा आहे तिच्या किंमतीची. ही हँडबॅग 51.6 लाख रुपयांना विक्री झाली आहे. हो तुम्ही वाचताय तो आकडा 51.6 लाख रुपयेच आहे. ही बॅग इतकी छोटी आहे की, ती पाहण्यासाठी मायक्रोस्कोपची गरज पडते. मीठाचा दाणा या बॅगपेक्षा मोठा आहे. CNN ने याविषयीची माहिती दिली आहे.
साईज आहे इतकी
सीएनएननुसार, गेल्या काही दिवसांपासून एका ऑनलाईन लिलावात या बॅगची विक्री झाली. मीठाच्या दाण्यापेक्षा ही बॅग छोटी आहे. ही बॅग 63000 डॉलर (51.6 लाख रुपये) विक्री झाली. या बॅगसोबत डिजिटल डिस्प्ले असलेला मायक्रोस्कोप विक्री करण्यात आला. त्यामुळे खरेदीदाराला ही हँडबॅग दिसेल. या बॅगेचा आकार 657×222×700 मायक्रोमीटर आहे. पिवळ्या आणि हिरव्या रंगाची ही बॅग सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
सुईच्या छिद्रातून जाईल
ही हँडबॅग इतकी छोटी आहे की, ती सुईच्या छिद्रातून आरपार जाईल. जून महिन्याच्या सुरुवातीला या बॅगचा फोटो MSCHF च्या इन्स्टाग्राम खात्यावरुन पोस्ट करण्यात आला होता. तेव्हा ही बॅग चर्चेचा विषय ठरली. या बॅगवर पर्स तयार करणारी कंपनी Louis Vuitton चा लोगो LV काढण्यात आला आहे.
कमेंट्सचा पाऊस
अर्थात अनेक युझर्सने हा मुर्खपणा असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी ब्रँडच्या नावामुळे या मायक्रो हँडबॅगची इतकी किंमत असल्याचा दावा केला आहे. युझर्संनी या पोस्टवर मजेदार कमेंट्स केले आहे. काहींनी या हँडबॅगमध्ये काय ठेवता येईल, असा प्रश्न विचारला आहे. ही बॅग श्रीमंतांसाठी तयार करण्यात आल्याची काहींनी प्रतिक्रिया दिली आहे.
जागतिक ब्रँड
Louis Vuitton हा एक जागतिक ब्रँड आहे. या ब्रँडच्या वस्तूंची किंमत लाखो रुपयांच्या घरात असते. लक्झरी ब्रँड म्हणून त्याची ओळख आहे. जगातील कलाकार, लोकप्रिय व्यक्ती, श्रीमंत या कंपनीचे उत्पादने घेतात.