चंद्रपूर : एक व्हिडीओ चंद्रपुरात फार व्हायरल (Viral Video) झाला आहे. एक हरीण एखाद्या पक्षाप्रमाणे हवेत झेपावलं आहे. ही झेप इतकी मोठी होती, की उपस्थित उडी घेणारा नक्की हरीणच (Deer) होता ना? याबाबत शंका घेऊ लागले. अत्यंत चपळाईनं पळत येत, हरणाने रस्ता ओलांडताना झेप घेतली, ती एकानं आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात (Mobile Camera) टिपली आहे. ही झेप नेमकी कुठची आहे? कुणी ती मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपली आहे? याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हरिणाची झेप पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. तहानलेलं हरिण पाण्यासाठी व्याकूळ झालं होतं. तलावाच्या काठी आलले्या या हरणानं पाण्याचा आस्वादही घेतला. मात्र याच वेळी काही कुत्रे मागे लागल्यानं हरिणानं पळ काढला. जीवाच्या आकांतानं पळणाऱ्या हरिणाची दौड तर थक्क करणारी होतीच. शिवाय या प्रकारे या हरिणानं हवेत भलीमोठी झेप घेत रस्ता ओलांडला, तेही अचंबित करणारं होतं.
सोशल मीडियावर सध्या हरिणाची ही उडी चांगलीच व्हायरल झाली आहे. घाबरेलंल हरीण रस्ता ओलांडण्यासाठी हवेत ज्याप्रकारे झेपावलं आहे, ते एखाद्या पक्षालाही लाजवेल. एरव्ही पर्यटकांना खूश करणारं हरीण आपल्या भल्यामोठ्या उडीनं सोशल मीडियावर चांगलच व्हायरल झालंय.
हरणाच्या वेगवेगळ्या प्रजाती असून सांबार हरीण ही भारतात आढळणारी हरणाची एक प्रमुख जात आहे. यातील नर असलेल्या हरिणाच्या डोक्यावर शिंग असतात. तर मादी हरिणाच्या डोक्यावर शिंगं नसतात. हरणाचं मुख्य खाद्य शाकाहारी असतं. हरिण शक्यतो गवत, पाने, फळे इत्यादी खातात. हरिण जंगली कुत्र्यांना प्रचंड घाबरतात. तसंच वाघ, बिबट्या मगरी या देखील हरणाचे मुख्य शत्रू असतात. दरम्यान हरणाचे सुसाट धावतानाचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण अशाप्रकारे हवेत झेपावणाऱ्या आणि रस्ता ओलांडणाऱ्या या हरणाचा व्हिडीओ आता चांगलाच गाजतोय. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठचा आहे आणि कधीचा आहे, हे कळू शकलेलं नाही. मात्र हा व्हिडीओ चंद्रपुरातील असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.