मुलगा मेल्याचं दुःख कोणत्या आई-बापाला होणार नाही? प्रत्येक आई-वडीलांना होणारच! पण मुलगा गेला, म्हणून त्याचं समाधान व्यक्त करणारे आईबाप तुम्ही कुठे पाहिले आहेत का? हा प्रश्न विचारण्यामागचं कारण आहे, एक महिलेनं मुलाच्या मृत्यूवर दिलेली विचित्र प्रतिक्रिया. मुलगा गेल्यामुळे बरं वाटलेल्या एका आईनं खरंच दिलासा व्यक्त केला आहे. टिकटॉकवर एका महिलेनं ‘बरं झालं माझा 6 वर्षांचा मुलगा मेला’ असं लिहिल्यामुळे अनेकांना धक्का बसला होता. पण असं लिहिण्यामागं, एक विशेष कारण आहे!
एक महिलेनं टिकटॉकवर आपल्या 6 वर्षांच्या मुलाच्या मृत्युमुळे आपल्याला बरं वाटत असल्याचं म्हटलंय. या महिलेचं नाव व्हिटनी फ्रॉस्ट असल्याचं कळतंय. आजतकनं याबाबतचं वृत्त दिलंय. आपल्या मुलासोबत काढलेले काही फोटो शेअर करत तिनं आपल्या मुलांच्या मृत्यूबाबत केलेल्या वक्तव्यानं अनेकांना धक्का बसला. एका आईनं अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर कुणाला नवल वाटलं नसतं, तरच आश्चर्य़!
व्हिटनीचे टिकटॉकवर 17 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यांचा मुलगा हा एका दुर्धर आजारनं त्रस्त झाला होता. त्याला आयएनएडी नावाचा एक भयंकर दुर्मिळ असा आजार झाला होता. हा आजार म्हणजे एक न्युरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. या आजारा मेंदूकडून शरीराला मिळमारे संदेश मिळणं बंद होऊन जातं. याला एक्सोन नर्व सेल म्हणतात. एक्सोन नर्व सेल हे आपल्या मेंदूतील संदेशांना शरीराच्या वेगवेगळ्या भागात पोहोचवतं. यावर अजूनतरी कोणताही उपचार नसल्यानं व्हिटनी यांच्या मुलाला प्रचंड त्रास आणि वेदना सहन कराव्या लागत होत्या. या आजारामुळे आपल्या शरीरातील मांसपेशी आणि डोक्यातील विचारांवर आपलं नियंत्रण राहत नाही. आणि माणूस पूर्णपणे विचित्र आणि विक्षिप्त गोष्टी करु लागतो.
व्हिटनी यांनी टिकटॉकवर व्हिडीओ शेअर करत एक मेसेज लिहिला होता. यामध्ये त्यांनी म्हटलंय की,..
माझा मुलगा हॅरिसननं आज जगाचा निरोप घेतला. लो लवकर या जगातून निघून गेला आहे आणि त्याला फार त्रासही झाला नाही. अर्थात, त्याच्या जाण्यानं आम्ही पूर्णपणे कोलमडून गेलो आहेत. पण आम्हाला आनंद आहे की आता त्याला कोणताच त्रास होत नसेल. त्याला कोणतीही वेदना जाणवत नसतील, याचं आम्हाला समाधान वाटतंय.
1 जानेवारीला व्हिटनी यांनी हा व्हिडीओ टिकटॉकवर शेअर केला होता. दरम्यान, त्याआधी काही दिवसच हॅरिसनचे प्रकृती सुधारत असल्याचे काही फोटोही व्हिटनी यांनी शेअर केले होते. त्यात हॅरीसच्या प्रकृती सुधारणा दिसून आली होती. त्यावेळी अनेकांनी व्हिटनी यांना धीर देण्यासाठी, त्यांना विश्वास देण्यासाठी त्यांच्यासोबत असल्याचं म्हटलं होतं.
दरम्यान, आता आपला मुलगा आपल्यासोबत नसला तरिही आम्हाला याचा आनंद आहे, की जो आपल्या वेदनांमधून मुक्त झाला आहे. त्याच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आम्हाला लक्षात राहिल. त्याच्या इतका आनंदी मुलगा मी कधीच पाहिला नव्हता, असंही व्हिटनी यांनी आपल्या मुलाबाबत लिहिलंय. दरम्यान, Meawww या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार व्हिटनी यांची आणखी एक मुलगीदेखील याच दुर्धर आजारानं ग्रस्त आहे. सगळ्यांना आता त्यांच्या मुलीचीही काळजी लागली आहे. कारण या आजारात माणूस फार वेळ जिवंत राहणं शक्य नाही, असं जाणकार सांगतात. दरम्यान, व्हिटनी यांनी मुलाच्या मृत्यूबाबत केलेल्या पोस्टवर लाखो लोकांनी प्रतिक्रिया दिल्यात. अनेकांनी त्यांना मदत करण्यासाठी तयारीही दर्शवली आहे. सोबत त्यांच्या मुलाच्या आत्म्यास शांती लाभो, असं म्हणत लोकांनी हॅरीसनला श्रद्धांजली वाहिली आहे.
Video | 63 वर्षांच्या ‘डान्सिंग दादी’नं मोह मोह के धागे गायलं, श्रोते म्हणाले, ‘वन्स मुअर आजी’
VIDEO : अंगावर काटा आणणारा व्हिडीओ! चक्क एका मुलीने घेतली चित्त्याची किस्स…व्हिडीओ पाहून अवाक व्हाल
VIDEO : काय सांगता…! चक्क माणसाप्रमाणे माकडाने घातली त्याच्या तान्हुल्या लेकराला अंघोळ!