गृहपाठासाठी शाळेने व्हॉट्सॲप ग्रुप बनवला, पण दोन पालक प्रेमात पडले आणि…

| Updated on: Nov 02, 2024 | 4:53 PM

शाळेतील मुलांना घरी दिलेला अभ्यास पालकांना कळावा आणि त्यांच्या अभ्यासावर लक्ष देता यावे यासाठी एका शाळेने विद्यार्थ्यांच्या पालकांचा एक ग्रुप बनवला होता. व्हॉट्सॲप ग्रुपच्या मदतीने शिक्षक पालकांसोबत संवाद साधत होते. पण यामध्ये दोन पालक असे ही होते जे मुलांच्या गृहपाठावर वैयक्तिक बोलू लागले. पण पुढे काही वेगळंच घडलं.

गृहपाठासाठी शाळेने व्हॉट्सॲप ग्रुप बनवला, पण दोन पालक प्रेमात पडले आणि...
Follow us on

प्रेम आणि युद्धात सर्व काही न्याय्य असते अशी एक म्हण आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. जेथे मुलांच्या वर्गातील पालकांचा एक ग्रुप शाळेने बनवला होता. ज्यामध्ये मुलांना दिलेला गृहपाठ शेअर केला जात होता. पण यामुळे दोन विवाहित जोडप्यांमध्ये मैत्री झाली. क्लास ग्रुप संभाषण दरम्यान दोघांनी एकमेकांशी संपर्क साधला आणि हळूहळू त्यांच्यात जवळीक वाढू लागली. गृहपाठ आणि मुलांच्या शिक्षणावर लक्ष ठेवण्यासाठी हा चॅट ग्रुप शाळेने तयार केला होता. पण यामुळे भलतंच काही घडलं.

दोघेही पालकांचं संभाषण सुरु झालं. जे प्रेम प्रकरणापर्यंत पोहोचलं. पण नंतर जे घडलं त्याने सगळ्यांनाच धक्का बसला. कारण ते दोघेही आपापल्या कुटुंबाला सोडून पळून गेले. झांग आणि वेन अशी या दोघांची नावे आहेत. ही घटना चीनमध्ये घडली आहे. पण या पासून सगळ्यांच शाळांनी धडा घेतला आहे. झांग यांना चार तर वेन यांना दोन मुले होती. दोघेही मुलांना सोडून पळून गेले. मुलांच्या गृहपाठावर बोलता बोलता ते कधी प्रेमात पडले हे त्यांना देखील कळाले नाही.

ही गोष्ट सोशल मीडियावरुन समोर आली. झांग म्हणाली की ती तिच्या पतीच्या कौटुंबिक हिंसाचाराला कंटळली होती, ज्यामुळे तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम झाला होता. पती तिला मारहाण करायचा. झांगने वेनला पळून जाऊन नवीन जीवन सुरू करण्यास सुचवले. यानंतर, घटस्फोट न घेता, वेन झांगसोबत 680 किलोमीटर दूर असलेल्या टियांजिन शहरात गेले तेथे ते दोघेही पाच वर्षे एकत्र राहिले.

टियांजिनमध्ये एकत्र राहत असताना, झांग गरोदर राहिली आणि वेन देखील घटस्फोट घेण्यासाठी घरी परतला. त्यानंतर झांगनेही पतीला घटस्फोट दिला. 24 मे रोजी दोघेही हेनान येथे परतले आणि पोलिसांना त्यांच्या नातेसंबंधाची माहिती दिली. अहवालानुसार, त्यांच्या मुलाचे जन्म प्रमाणपत्र आणि ओळखपत्रांबाबत कायदेशीर अडचणींमुळे त्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले गेले.

न्यायालयाने दोघांना द्विविवाहासाठी दोषी ठरवले आणि चार महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. झांगची शिक्षा सहा महिन्यांसाठी स्थगित केली जेणेकरून ती आपल्या मुलाची काळजी घेऊ शकेल.