मुंबई : नुकताच एक घटना उघडकीस आलीये. ज्यानंतर सर्वजण हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. सध्या सर्वांच्याच लाईफस्टाईलमध्ये अनेक बदल बघायला मिळतात. रात्री उशीरापर्यंत जागणे आणि सकाळी उशीरापर्यंत झोपणे यावर अनेकांचा भर दिसतो. मात्र, याचा कुठेतरी आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. सध्या अनेक विचित्र प्रकारचे आजार हे लोकांना होताना दिसतात. या आजारांपासून वाचण्यासाठी बरेच लोक काळजी घेताना दिसतात. दररोज काही धक्कादायक प्रकार हे कानावर पडताना दिसतात.
बऱ्याच वेळा रस्त्यांनी चालणारा व्यक्ती पडतो आणि त्याचा जागीच जीव जातो. अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यानंतर लोक चांगलेच हादरल्याचे बघायला मिळतंय. चक्क कार चालवत असताना एका व्यक्तीची श्वसन नलिकाच फुटली. धक्कादायक म्हणजे ही जगातील पहिल्यांदा घडलेली घटना आहे. या घटनेनंतर अनेक चर्चांना उधाण आले.
एक व्यक्ती कार चालवत होता. यावेळी त्याला शिंक येते. मात्र, शिंक रोखण्यासाठी त्याने तोंडाला आणि नाकाला रूमाल लागला. त्यानंतर थेट त्याच्या श्वसन नलिकेमध्ये दोन मिली मीटरचे छिंद्र पडले. शिंक रोखल्यामुळे हे घडल्याचे सांगितले जाते. त्याच्या घशामध्ये प्रेशर जास्त झाल्याचे ही घटना घडली असल्याचे सांगितले गेले.
या प्रकारानंतर तो व्यक्ती थेट दवाखान्यात गेला. त्यावेळी त्याच्या गळ्याभोवती सूज दिसून आली. त्या व्यक्तीला प्रचंड असा त्रास होत होता. आता हा व्यक्ती व्यवस्थितपणे श्वास घेऊन शकतो, जेवण करू शकतो आणि गप्पा देखील मारू शकतो. एक्स-रे केल्यानंतर ही बाब समोर आली की, या व्यक्तीला सर्जिकल एमफीसेमा नावाचा गंभीर रोग आहे.
डाॅक्टरांनी दोन दिवसांनंतर या व्यक्तीला घरी पाठवले. मात्र, दोन आठवडे त्याला जास्त काम करण्यापासून रोखले आहे. फक्त शिंक रोखल्यामुळे या व्यक्तीची श्वसन नलिकाच फुटल्याने लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळाले. हा प्रकार संपूर्ण जगामध्ये पहिल्यांदाच घडल्याचे बघायला मिळाले आहे. आता त्या व्यक्तीची तब्येत व्यवस्थित असल्याचे सांगितले जाते.