शक्तिमान से भी तेज दिमाग! जुगाड केला, व्हायरल झाला

| Updated on: Oct 14, 2022 | 5:41 PM

इथे जागा कमी, महागाई जास्त त्यामुळे एकतर जागेत जुगाड केला जातो नाहीतर वस्तूंमध्ये. कधी कधी तर वस्तूंमध्ये आणि जागेत मिळून जुगाड केला जातो.

शक्तिमान से भी तेज दिमाग! जुगाड केला, व्हायरल झाला
Split ac in a mumbai hotel
Image Credit source: Social Media
Follow us on

भारतात जुगाड करणं काय नवीन नाही. जुगाड करणं ही इथे फारच नेहमीची गोष्ट झालीये. त्यात जर मुंबई म्हटलं तर मुंबईत जुगाडाची फारच गरज आहे. इथे जागा कमी, महागाई जास्त त्यामुळे एकतर जागेत जुगाड केला जातो नाहीतर वस्तूंमध्ये. कधी कधी तर वस्तूंमध्ये आणि जागेत मिळून जुगाड केला जातो. हे व्हायरल ट्विट याचं उत्तम उदाहरण आहे. यात जागेचा आणि वस्तूचा दोन्हीचा जुगाड करण्यात आलाय. दोन खोल्यांमध्ये इथे वरची भिंत पाडण्यात आली. ती जागा दोन खोल्यात कॉमन केली गेली आणि त्या जागेत एक एसी बसविण्यात आला. बघा तुम्हीच…

काम सोपं करण्यापासून ते वेळेची बचत करण्यापर्यंत सगळीकडे जुगाड फिट बसतो. एवढेच नव्हे तर एखादी वस्तू खूप महागडी असताना त्याची व्यवस्था कशी केली पाहिजे, त्याचा जुगाड कसा केला पाहिजे हे फक्त भारतीयच सांगू शकतात.

एक भारतीय आपलं डोकं असं काही चालवतो की जे हवं ते काम करतो. काम सुद्धा असं काही पूर्ण होतं की त्यासाठी जास्त पैसे लागत नाही आणि वेळही जात नाही. आता व्हायरल होणारा हा जुगाडच बघा. हा जुगाड इतका अचूकपणे बसला आहे की, या जुगाडबाजांची स्तुती करताना तुम्ही सुद्धा मागे राहणार नाही.

हे व्हायरल प्रकरण मुंबईतील एका हॉटेलचं आहे, त्यात दोन खोल्यांमध्ये एसी शेअरिंगचा जुगाड पाहण्यासारखा आहे. त्यासाठी दोन खोल्यांमधील भिंतीला छिद्र करून त्यात एसी बसवण्यात आला आहे.

हाफ एसीमधून हवा एका खोलीत आणि हाफ दुसऱ्या खोलीत जाते. लोकांनी या ट्विटचा आनंद घेतला आहे. ते म्हणत आहेत की हे केवळ भारतातच घडते.