बापरे! रील बनवण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर गेला, मागून आली रेल्वे, धक्कादायक व्हिडीओ

| Updated on: May 04, 2023 | 5:27 PM

तसं पाहिलं तर आजकाल लोक इन्स्टाग्रामचा जास्त वापर करत आहेत, विशेषत: तरुण मुलं-मुली. रिल्स बनवण्यामागे ते इतके वेडे होत आहेत की ते काहीही करायला तयार असतात. त्यांनी आपला जीवही पणाला लावला. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे लोकांना धक्काच बसलाय.

बापरे! रील बनवण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर गेला, मागून आली रेल्वे, धक्कादायक व्हिडीओ
Railway Accident
Follow us on

मुंबई: सोशल मीडियावर कोण नाही? सगळेच सोशल मीडियावर असतात. अजूनही सोशल मीडियाचा वापर न करणारे फार कमी लोक आपल्याला सापडतील. आता जवळजवळ प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो. तसं पाहिलं तर आजकाल लोक इन्स्टाग्रामचा जास्त वापर करत आहेत, विशेषत: तरुण मुलं-मुली. रिल्स बनवण्यामागे ते इतके वेडे होत आहेत की ते काहीही करायला तयार असतात. त्यांनी आपला जीवही पणाला लावला. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे लोकांना धक्काच बसलाय.

खरंतर या व्हिडिओमध्ये एक मुलगा रेल्वे ट्रॅक जवळ रील बनवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, पण मग अचानक ट्रेन तिथे येते आणि त्यानंतर जे घडते ते खरोखरच हृदयद्रावक आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मुलगा ट्रॅकवर हळूहळू चालतोय. खरं तर तो रील बनवण्याचा प्रयत्न करत असतो, पण या दरम्यान त्याचा अपघात होईल याची त्याला कल्पनाही नसते. आश्चर्याची बाब म्हणजे ट्रेन येत आहे की नाही हेही मुलगा मागे वळून पाहत नाही. तो फक्त मौजमजेत चालत राहतो, पण तेवढ्यात ट्रेन येऊन त्याला थेट धडकते.

ही हृदयद्रावक घटना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @clipsthatgohard नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आली आहे. अवघ्या 15 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 3 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइक देखील केले आहे.

त्याचबरोबर हे धक्कादायक दृश्य पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, तो सोशल मीडियावर व्हिडिओ बनवत आहे. तो स्लो मोशनमध्ये रेकॉर्डिंग करत होता आणि त्याला वाटले की तो ट्रेनपासून सुरक्षित अंतरावर आहे, परंतु प्रत्यक्षात तो ट्रॅकच्या अगदी जवळ होता. त्यामुळे तो एका गंभीर अपघाताला बळी पडला. आता हा अपघात किती गंभीर आहे ते तुमची बघा आणि व्हिडीओ काढण्यासाठी असे स्टंट अजिबात मारू नका.