रस्त्यावर गाडी चालवताना सावधानता बाळगा, असं म्हटलं जातं. काही लोक दुचाकी आणि स्कूटी चालवताना खूप बेफिकीर असतात आणि रस्त्याच्या नियमांचे उल्लंघन करताना अजिबात विचार करत नाहीत. मग तो लाल दिवा ओलांडणं असो किंवा चुकीच्या बाजूने गाडी चालवणं असो. शॉर्ट कटच्या प्रयत्नात लोक आपला जीव धोक्यात घालतात. कधी कधी आपण मागे-पुढे न बघता आपली गाडी लवकर बाहेर काढण्याच्या शर्यतीत असतो. अशा परिस्थितीत एखादी छोटीशी चूक कुणाचा जीव घेऊ शकते. असाच काहीसा प्रकार एका मुलीसोबत घडला जेव्हा ती रस्त्यावर स्कूटी चालवत होती.
स्कुटीवरून जाणारी ही मुलगी कशाचीही पर्वा न करता एका मोठ्या ट्रकसमोर उभी राहिली. मात्र, याबाबत ट्रक चालकाला माहिती नव्हते.
सिग्नलला उभ्या असलेल्या वाहनांच्या मध्ये उभी असलेली मुलगी ट्रक चालकाला दिसली नाही हिरवा दिवा लागताच ट्रक चालकाने ट्रक पुढे घेतला, मुलगी धक्का लागून खाली पडली आणि ट्रक त्या गाडी आणि मुलीवरून गेला.
ती मुलगी खूप नशीबवान होती, जिची स्कूटी ट्रकखाली आली पण ती मुलगी टायरच्या खाली अडकली नाही. ती ट्रकच्या मध्यभागी पडली.जेव्हा ट्रक तिच्या अंगावरून गेला तेव्हा तिला जराही खरचटलं नाही.
व्हिडिओत सुद्धा बघताना वाटलं की आता ही मुलगी जगत नाही. ती नक्कीच चिरडली गेली असावी. पण मंडळी नशीब बलवत्तर!
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. यानंतर जेव्हा ट्रक पुढे निघून गेला, मुलगी पटकन उठून बाजूला झाली
व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला आहे. आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी याला लाईक केलं असून अनेकांनी आपलं मत मांडलं.