रस्त्यावर चालत्या बाइकवरून स्टंट (Bike Stunt) दाखवणं ही आजची फॅशन झाली आहे. जिथे बघावं तिथे स्टंटमॅन दिसतात. पण या सगळ्या इतरांच्या स्टंट्समध्ये लोकही अपघातांचे (Accident) बळी ठरतात. स्टंट मारणारे सुद्धा भर रस्त्यात भरधाव वेगाने दुचाकी चालवत स्टंट दाखवण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा स्टंट दाखवण्यात ते यशस्वी होतात, पण काही वेळा ते अपयशीही ठरतात आणि ते स्वत:चंच नुकसान करून घेतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होत आहे, ज्यामध्ये एक भयंकर अपघात पाहायला मिळतो आणि त्यातही एका मुलाचं नशीब इतकं फ़ुटकं आहे की, तो अवघ्या 9 सेकंदात दोनदा अपघाताचा बळी ठरतो.
या स्टंट मारणाऱ्या मुलाचा एकदा अपघात होतो तो पटकन उठून रस्त्याच्या कडेला जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण नंतर दुसरी दुचाकी त्याच्याकडे येते आणि तो बिचारा पुन्हा अपघाताचा बळी ठरतो. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, तीन मुलं बाईकवर जात आहेत, तेव्हा त्यांची गाडी स्लिप होते आणि ते रस्त्यावर पडतात. यानंतर तिघंही पटकन उठून रस्त्याच्या कडेला जायचा प्रयत्न करतात, पण कडेला जात असताना एका मुलाला दुचाकीस्वाराची धडक बसून तो पुन्हा अपघाताला बळी पडतो.
How unlucky ??? pic.twitter.com/YKaAWry690
— 24/7vids???️ (@mrwhite321) August 18, 2022
हा धक्कादायक, पण मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @mrwhite321 नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. 9 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 26 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनीही हा व्हिडिओ लाईक करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने ‘आसमान से गिरे और खजूर में अटके’, असे मजेशीर पद्धतीने लिहिले आहे, तर काही युझर्स त्याचं ‘वाईट नशीब’ पाहून आश्चर्यचकित झाले आहेत.