NEET परीक्षा क्रॅक केल्यानंतर मुलीला आई-वडिलांकडून iPhone 12, दिलखुलास व्हिडीओ

| Updated on: Nov 12, 2022 | 10:29 AM

गेल्या पाच वर्षांपासून ही मुलगी आपल्या आईचा जुना फोन वापरत होती आणि तिने कधीही आई-वडिलांकडे काहीही मागितले नव्हते.

NEET परीक्षा क्रॅक केल्यानंतर मुलीला आई-वडिलांकडून iPhone 12, दिलखुलास व्हिडीओ
iPhone 12 Gift
Image Credit source: Social Media
Follow us on

बरेचदा पालक आपल्या मुलांना भेटवस्तू देऊन आश्चर्यचकित करतात. तुम्हाला आठवतंय का की एखाद्या परीक्षेत तुम्ही पहिला नंबर मिळवला आणि मग घरच्यांनी तुम्हाला मस्त अशी भेटवस्तू दिलीये? अठराव्या वाढदिवशी एका मुलीच्या आई-वडिलांनी तिला नवीन मोबाइल फोनने सरप्राइज दिलंय. या सगळ्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. हा व्हिडिओ २० ऑक्टोबर रोजी मुलीची आई आरजे महक यांनी शेअर केला होता आणि आतापर्यंत त्याला ६.८ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या मुलीने 12 वी मध्ये विज्ञान शाखेत आपल्या शाळेत प्रथम क्रमांक मिळविला, असे त्यात म्हटले आहे. तिने नीट परीक्षेत ६८०/७२० गुण मिळवले आणि १८ लाख विद्यार्थ्यांमध्ये भारतात ८९७ वा क्रमांक मिळविला.

गेल्या पाच वर्षांपासून ही मुलगी आपल्या आईचा जुना फोन वापरत होती आणि तिने कधीही आई-वडिलांकडे काहीही मागितले नव्हते. त्यांनी तिच्या वाढदिवशी नवीन आयफोन 12 तिला दिला.

गिफ्ट पाहताच ती मुलगी खरोखरच खुश झाली आणि उत्साहाने तिने ते गिफ्ट उघडलं. उघडू लागली आणि बॉक्समध्ये आयफोन पाहताच तिच्या आनंदाला जागाच उरली नाही.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आम्ही आमच्या मुलीला तिच्या 18 व्या वाढदिवशी सरप्राईज देण्याचा निर्णय घेतला. तिने आमच्याकडे कधीही काही मागितले नाही. जेव्हा जेव्हा आम्ही तिला विचारतो की तुला काय हवे आहे आणि ती म्हणते की माझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. तिच्यासारखी मुलगी आमची मुलगी आहे हा आमच्यासाठी आशीर्वाद आहे.”

एका युझरने लिहिले की, “ती किती सुंदर मुलगी आहे.” आणखी एका युझरने लिहिले की, “माझे आई-वडील महागड्या भेटवस्तू देत नाहीत, अशी माझी नेहमीच तक्रार असते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, मी चांगला मुलगा नाही.

दुसऱ्याने लिहिले, “तिचे अभिनंदन आणि ती त्यासाठी पात्र आहे आणि बरेच यश येणे बाकी आहे. फ्युचर डॉक्टर’.