एक घटना प्रचंड व्हायरल होतीये. गुजरातच्या वडोदरामधली (Vadodara, Gujarat) ही घटना आहे. आपल्या पतीने लग्नाच्या आठ वर्षानंतर आपण आधी स्त्री असल्याचा सांगितलं असल्याचा आरोप एका महिलेने केलाय. आपल्या पतीने आपलं लिंग (Gender) लपवल्याचा आरोप या महिलेकडून करण्यात आलाय. दरम्यान पती मात्र हे आरोप फेटाळताना दिसतोय. लग्नाआधीच (Before Marriage) पत्नीला सर्व काही सांगण्यात आलं असल्याचं स्पष्टीकरण पतीकडून देण्यात येतंय.
डॉ. विराज वर्धन यांनी जेंडर रीअसाइनमेंट सर्जरी केलीये. आपण ही लिंग बदलण्यासाठी असणारी ही सर्जरी करतोय आणि तिचे तीन टप्पे बाकी आहेत अशी कल्पना आपण आपल्या पत्नीला लग्नाआधीच दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
2014 मध्ये या जोडप्याचं लग्न झालंय. लग्नाच्या आठ वर्षानंतर आपल्या पतीच्या आधीच्या लिंगाविषयी आपल्याला माहिती मिळाली असल्याचं पत्नीचं म्हणणं आहे. आपला पती लग्नाआधी महिला असल्याची खबर त्याने आपल्याला लागू दिली नसल्याचा आरोप पत्नीचा आहे.
हे सगळेचआरोप पतीने फेटाळलेत. मात्र लग्नाआधी तो एक स्त्री होता याची त्याने कबुली दिलीये. लग्नापूर्वीच त्याने आपले लिंग बदललं असल्याचं सांगितलंय. याबाबत पत्नीलाही कल्पना दिली होती असं विराजचं म्हणणं आहे. ही घटना मात्र आता बरीच चर्चेत आहे.
लग्नाआधी घराची मागणी पूर्ण न झाल्याने त्याच्या पत्नीने साखरपुडा मोडला होता असंही विराज आरोप फेटाळताना सांगतो. जेंडर रीअसाइनमेंट सर्जरी करून आपण आपलं लिंग बदललं आहे याचीही कबुली तो देतो.