एका रोबोटकडून 12 रोबोटचे अपहरण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

| Updated on: Nov 22, 2024 | 2:32 PM

Robot kidnaps other Robots: सुरुवातीला युजरकडून हा व्हिडिओ खोडसाळ म्हणून नाकारण्यात आला. परंतु नंतर शांघाय शोरूम आणि हँगझोऊमधील एर्बाईच्या निर्मात्याने व्हिडिओ खरा असल्याची पुष्टी केली. हांगझूच्या प्रवक्त्यानुसार, एर्बाईने मोठ्या रोबोटच्या ऑपरेटिंग सिस्टममधील सुरक्षा त्रुटीचा फायदा घेतला.

एका रोबोटकडून 12 रोबोटचे अपहरण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Roboat
Follow us on

Robot kidnaps other Robots: सध्या सोशल मीडियावर एका व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका रोबाटिक्स शोरुमधील हा व्हिडिओ आहे. एका लहान आकाराच्या रोबोटने 12 मोठ्या रोबोट्सचे अपहरण केले आहे. रोबोटने रोबोट्सचे अपहरण केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. चीनमधील शंघाई शहरातील ही घटना व्हायरल झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एर्बाई नावाचे एआय रोबोट दुसऱ्या रोबोटशी बोलताना दिसत आहे. त्यानंतर त्यांना आपल्यासोबत नेत असल्याचे दिसत आहे. ही घटना पाहून सोशल मीडियावर युजर्स आश्चर्य व्यक्त करत आहे.

एर्बाई नावाचा एआय रोबोटला हांग्जो येथील एका कंपनीने बनवले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये शंघाईच्या शोरुममध्ये हा रोबोट दिसत आहे. तो इतर रोबोट्ससोबत मानवासारखे बोलताना दिसत आहे. त्यानंतर तो त्या रोबोटांना समजून त्या शोरुममधून बाहेर घेऊन जात आहे. त्याच्या बोलण्यानंतर ते सर्व रोबोट त्याच्या मागे जात असताना दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

12 रोबोट बाहेर आले

व्हिडिओमध्ये एका ठिकाणी, एक रोबोट त्याच्या व्यस्त कामाच्या वेळापत्रकाबद्दल दुःख व्यक्त करतो. तो म्हणतो की त्याला कामातून वेळ मिळत नाही. त्यावर एर्बाई ऑफर देतो. तो त्यांना म्हणतो ‘मग चल माझ्यासोबत.’ त्याच्या या ऑफरनंतर एकामागे सर्व 12 रोबोट त्याच्या मागे जातात.

व्हिडिओची निर्मात्याकडून पुष्टी

सुरुवातीला युजरकडून हा व्हिडिओ खोडसाळ म्हणून नाकारण्यात आला. परंतु नंतर शांघाय शोरूम आणि हँगझोऊमधील एर्बाईच्या निर्मात्याने व्हिडिओ खरा असल्याची पुष्टी केली. हांगझूच्या प्रवक्त्यानुसार, एर्बाईने मोठ्या रोबोटच्या ऑपरेटिंग सिस्टममधील सुरक्षा त्रुटीचा फायदा घेतला. त्यामुळे त्याला त्यावर नियंत्रण मिळवता आले.

या घटनेची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यूजर्स त्यावर आश्चर्यकारक प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘हा रोबोट मोठा झाल्यावर काय करेल याची मी कल्पनाही करू शकत नाही.’
आणखी एका यूजरने म्हणतो, ‘चीन खूप आधुनिक आहे.’