विमानाचे अनेक अपघात घडत राहतात बरेचदा या दुर्दैवी घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. परंतु कल्पना करा की विमान हवेत टेकऑफ झाले आहे आणि त्यात प्रवासीही बसले आहेत. मग अचानक त्याचे दार उघडले तर काय होईल. विमानाचा दरवाजा अचानक उघडल्याचा असाच एक प्रकार समोर आला आहे. याचा एक भयानक व्हिडिओही समोर आला आहे.
वास्तविक, या विमानाने 9 जानेवारीला रशियाच्या सायबेरियन भागात असलेल्या मगन नावाच्या ठिकाणाहून उड्डाण केले होते. द मिररच्या ऑनलाइन रिपोर्टनुसार, हे विमान मगदानला जाणार होते.
मिळालेल्या माहितीनुसार, विमानात 25 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. या विमानाने उड्डाण केले तेव्हा तिथे खूप थंडी पडली होती.
या विमानानं टेक ऑफ केलं, मगदानच्या दिशेने उड्डाण करताच त्याचा दरवाजा अचानक उघडला. आश्चर्यकारक बाब म्हणजे ज्या विमानाचा दरवाजा उघडा होता तोच सामान चढवण्या-उतरण्यासाठी वापरला जातो.
✈️ Nothing unusual: in Russia, the door of the plane opened right during the flight at an altitude of several kilometers
An-26, flying from Magan to Magadan, suddenly depressurized – judging by the video, which was filmed by one of the passengers, the back door was half opened. pic.twitter.com/GdBFdHdRML
— Oriannalyla ?? (@Lyla_lilas) January 9, 2023
हा दरवाजा उघडताच वेगवान वाऱ्यामुळे विमानातील पडदे उडू लागले. त्यामुळे विमानातील तापमान कमालीचे घसरले.
विमानात उपस्थित असलेल्या एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. विमानात बसलेल्या प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला आणि त्यानंतर विमानाच्या पायलटने विमान उतरवण्याचा निर्णय घेतला.
सुदैवाने, विमान सुरक्षितपणे उतरले आणि त्यात बसलेले सर्व प्रवासी आणि इतर सदस्य सुरक्षित असल्याचे दिसून आले.