JollyLLB3 | जॉली एलएलबीने (Jolly LLB) न्यायव्यवस्थेसोबतच पोलीस खात्यातील अनेक बारकावे टिपले आहे. येथील व्यवस्था सर्वसामान्यांना कशी नागवते याचे खुशखशीत दर्शन या चित्रपटाने दाखवल्याने चित्रपट समीक्षकांसह प्रेक्षक ही अंतर्मूख झाला. हा बॉलीवूडमधील (Bollywood) सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी (Best Cinema) एक मानला जातो. आतापर्यंत या चित्रपटाचे दोन भाग तयार करण्यात आले आहेत. अर्शद वारसी पहिल्यांदा जॉली एलएलबीमध्ये दिसला. त्यानंतर अक्षय कुमार त्याच्या सिक्वेल म्हणजेच जॉली एलएलबी 2 मध्ये दिसला. दोन्ही कलाकारांनी उत्तम काम केले आणि त्यामुळेच दोन्ही चित्रपटांना थिएटरमध्ये प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. आता चर्चा रंगली आहे ती, जॉली एलएलबी 3 ((JollyLLB3) या सिनेमाची. या सिनेमात अर्शद आणि अक्षय एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्या या चित्रपटात दोघांचा युक्तीवाद रंगणार आहे. तर सदाबहार सौरभ शुक्ला न्यायाधीशाच्या भूमिकेत झळकतील.
जॉली एलएलबीमध्ये अर्शद वारसी हिट अँड रन केस लढताना दिसला होता, तर जॉली एलएलबी 2 मध्ये अक्षय कुमार एका बनावट चकमक प्रकरणाची वकिली करताना दिसला होता. आता असे बोलले जात आहे की हा तिसरा चित्रपट देखील इतर दोन चित्रपटांप्रमाणेच अप्रतिम कथानकासह असेल असा विश्वास प्रेक्षकांना आणि समिक्षकांना आहे. याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. काही लोक म्हणतात की हा चित्रपट जबरदस्त असेल, ते त्याची वाट पाहत असतील तर काही लोक विविध मजेदार मीम्स बनवून शेअर करत आहेत.
चित्रपटाच्या पहिल्या भागात अर्शद वारसीने आपल्या कॉमेडीने सर्वांना प्रभावित केले होते, तर दुसऱ्या भागात अक्षय कुमारने देशभक्तीची जादू पसरवली होती. आता हाती आलेल्या बातमीनुसार, जॉली एलएलबी 3 या चित्रपटात अर्शद वारसी आणि अक्षय कुमार स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार, अक्षय कुमार आणि अर्शद वारसी हे दोघेही स्टार स्टुडिओ निर्मित सुभाष कपूरच्या ‘जॉली एलएलबी 3’ मध्ये एकत्र येऊ शकतात. पुढील वर्षीही हा चित्रपट सिनेमागृहात येण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी सांगितले की, “सुभाष कपूर, अक्षय कुमार आणि अर्शद वारसी गेल्या काही काळापासून जॉली एलएलबी 3 साठी चर्चेत होते आणि आता सुभाष कपूर यांनी एक नवीन कल्पना मांडली आहे. यासह, दोन्ही अभिनेत्यांनीही सहमती दर्शवली आहे. सुभाष कपूर यांची योजना आहे की या दोन्ही कलाकारांना पुढच्या सिक्वेलमध्ये रसिकांसमोर आणायचे.”
यावर हे मजेदार मीम्स रंगत आणत आहेत
#JollyLLB3 is coming on early 2023.
Le fans: pic.twitter.com/tIGfgPX92h
— Bangali Babu (@qareebnjr) August 23, 2022
#JollyLLB3 #AkshayKumar vs #ArshadWarsi
When Two Jolly will face each other,
Judge Sunder Lal Tripathi : pic.twitter.com/CLf6eFOSNw
— g0v!ñD $#@®mA (@rishu_1809) August 23, 2022
It will be really interesting to see the faceoff between these two great actors in #JollyLLB3#AkshayKumar #ArshadWarsi pic.twitter.com/uRJfwNaRhM
— Aaradhya (@Aaradhy1999) August 23, 2022