Breath Analyser : अल्कोहल टेस्टिंग मशीन कसं काम करते? तुम्ही किती दारु प्यालात हे कसं समजतं?

| Updated on: Dec 31, 2024 | 3:15 PM

Breath Analyser : अल्कोहल टेस्टिंग मशीन काय आहे? आणि ती कसं काम करते? दारु पिऊन गाडी चालवणारे कसे पकडले जातात? या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला इथे मिळतील. त्याशिवाय ब्रेथ एनालायजर किती मद्य शोधते आणि किती नाही.

Breath Analyser : अल्कोहल टेस्टिंग मशीन कसं काम करते? तुम्ही किती दारु प्यालात हे कसं समजतं?
Breath Analyser
Follow us on

नवीन वर्ष सुरु व्हायला आता फक्त काही तास उरले आहेत. रात्री पार्टी सुरु झाल्यानंतर अनेक जण मद्यपान करुन निघतील. त्यात काही जण पकडले जातील. पोलीस कर्मचारी एका मशीनच्या माध्यमातून सत्य समोर आणतील. त्यानंतर दंड भरावा लागेल. पार्टीच आनंद वैतागण्यात बदलेल. तुम्ही मद्यपान करुन गाडी चालवताय की नाही? हे शोधण्यासाठी वाहतूक पोलीस जी मशीन वापरतात, ती कशी काम करते?. ड्रायव्हर दारु प्याला आहे, हे पोलिसांना कसं समजतं? न्यू ईयर पार्टीमध्ये जाण्याआधी ही अल्कोहल टेस्टिंग प्रोसेस काय आहे? ती कशी काम करते? या बद्दल जाणून घ्या.

Breath Analyser कसं काम करते?

ज्या उपकरणाच्या मदतीने अल्कोहल टेस्टिंग केली जाते, त्याला एनालायजर (Breath Analyser) बोलतात. ब्रेथ एनालायजरच्या माध्यमातून शरीराच्या आत असलेल्या अल्कोहलच्या प्रमाणाची माहिती मिळते. हे डिवाइस तोंडाद्वारे निघणाऱ्या हवेच्या माध्यमातून रक्तात असलेल्या मद्याची चाचणी करते. या मशीनमध्ये फक्त एक फुंकर मारल्यानंतर शरीरातील मद्याच प्रमाण समजू शकतं. या डिवाइसमध्ये एक डिस्प्ले सुद्धा असतो.

श्वासावाटे किती अल्कोहल बाहेर पडतं?

ब्रेथ एनालायजर, तोंडाद्वारे निघणाऱ्या हवेच्या माध्यमातून रक्तात असलेल्या मद्याची चाचणी करते. मद्यपान केल्यानंतर श्वासावाटे पाच टक्के अल्कोहल बाहेर पडतं. ब्रेथ एनलायजर ते डिटेक्ट करतं. याला ब्लड अल्कोहल कंसंट्रेशन (BAC) बोलतात.

ब्लड एल्कोहल कंसंट्रेशन लिमिट किती हवं?

भारतात पर्सनल व्हीकल चालवणाऱ्यांसाठी ब्लड एल्कोहल कंसंट्रेशन लिमिट 0.03 टक्के आहे. म्हणजे 100 मिलीलीटर रक्तात 30 मिलीग्राम अल्कोहल पाहिजे. कमर्शियल व्हीकल चालवणाऱ्यांसाठी हे लिमिट शून्य आहे.

ब्रेथ एनालायजर कसं काम करते?

या मशीनमध्ये ब्लो करुन अल्कोहलची माहिती मिळवता येते. अल्कोहल blood vessels च्या माध्यमातून रक्तात मिसळतं. जेव्हा तुम्ही श्वास सोडता, तेव्हा तोंड आणि नाकातून वास येतो. ब्रेथ एनालायजर तोंडातून निघणाऱ्या हवेद्वारे ब्लडमधील दारुच प्रमाण शोधून काढतं.

कुठली लाईट पेटली, तर तुम्ही सुरक्षित?

अल्कोहल टेस्टिंग मशीनमध्ये तीन लाइट्स असतात. हिरवी, पिवळी आणि लाल. मशीनमध्ये ग्रीन लाइट ब्लिंक झाली, तर तुम्ही गाडी चालवू शकता. म्हणजे तुमच्या रक्तात अल्कोहल नाहीय. यलो आणि रेडचा अर्थ तुम्ही नशेत गाडी चालवताय. काही ब्रेथ एनालायजर मशीनमध्ये लाईट नसते.