BOAT चा असा मजेशीर अर्थ, अमन गुप्तालाही आवडले!

| Updated on: Feb 03, 2023 | 6:52 PM

हे शब्द होते Happy, Money आणि Boat. एका मुलाने सुख आणि पैसा या अर्थाला चांगलं उत्तर दिलं, पण बोटीचा अर्थ असा होता की तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

BOAT चा असा मजेशीर अर्थ, अमन गुप्तालाही आवडले!
BOAT aman gupta
Image Credit source: Social Media
Follow us on

आजच्या काळात मुलांचा मेंदू अभ्यासापेक्षा मोबाईल आणि टीव्ही पाहण्यात जास्त गुंतलेला असतो. पुस्तकांची नावे माहीत नसली तरी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची माहिती त्यांना नक्कीच असते. काही वेळा वर्गात परीक्षेच्या वेळी मुले उत्तरपत्रिकेवर प्रश्नांची उत्तरे लिहिण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक वस्तूंबद्दल लिहितात. अशीच एक मजेशीर उत्तरपत्रिका सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. एका मुलाने BOAT चा असा मजेशीर अर्थ सांगितला मुलाचे हे गमतीशीर उत्तर अमन गुप्तालाही खूप आवडले.

खरं तर परीक्षेत मुलांना इंग्रजीचे काही शब्द देण्यात आले होते, त्यावर त्यांना एक वाक्य बनवायचे होते. हे शब्द होते Happy, Money आणि Boat. एका मुलाने सुख आणि पैसा या अर्थाला चांगलं उत्तर दिलं, पण बोटीचा अर्थ असा होता की तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

या फोटोत तुम्ही पाहू शकता की, ‘बीओएटी हा अमन गुप्ताच्या हेडफोनचा ब्रँड आहे’. अमन गुप्ता हे बोट चे (BOAT) सहसंस्थापक आहेत. सध्या तो खूप चर्चेत आहे आणि तेही शार्क टँक इंडिया नावाच्या एका शोमुळे.

अमन गुप्ताने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर मुलाच्या या मजेशीर उत्तरपत्रिकेचा फोटो शेअर केला आहे आणि मजेशीर अंदाजात लिहिले आहे की, ‘मी नेहमीच A फॉर Apple B फॉर boAt म्हणायचो.”