या पृथ्वीवर लाखो प्राणी आहेत, त्यापैकी काही लोकांना माहित आहेत, तर बहुतेक प्राणी लोकांना माहित नाहीत. काही प्राणी लोकांनी पाहिले नाही किंवा त्यांची नावे ऐकली नाहीत. जर आपण समुद्रातील प्राण्यांबद्दल सांगायचं झालं, तर कुणालाही 20 ते 30 प्राण्यांपेक्षा जास्तींची नावं माहित नसतील. पण, आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की समुद्रात 2 लाखांहून अधिक प्रजाती आतापर्यंत सापडलेल्या आहेत. समुद्रातील अशा लाखो प्रजाती आहे, ज्याबद्दल माणसांना काहीच माहिती नाही. , अशाच एका रहस्यमय सागरी प्राण्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो दिसायला खूप विचित्र आहे. त्याला पाहताच वाटतं जणू तो दुसऱ्याच जगातून आला आहे. (Amazing Sea Animal Fish Strange sea creature shocking video viral on social media)
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बेडकासारख्या या सागरी प्राण्याला दोन्ही बाजूंना 4-4 पाय आहेत आणि पायांच्या मदतीने तो खड्डा बनवत वाळूमध्ये प्रवेश करत आहे. त्यानंतर पुढच्याच क्षणात व्हिडिओमध्ये नाकाच्या आकाराची एक वस्तू वाळूच्या वर दिसत आहे, तर उर्वरित शरीर वाळूमध्ये गाडलेले आहे.
व्हिडीओ पाहा:
या विचित्र दिसणाऱ्या प्राण्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर नेचरफेव्हर या अकाऊंटवरुन नावाने शेअर करण्यात आला असून त्यासोबत ‘या जलचर प्राण्याचे नाव काय आहे?’ असे कॅप्शन लिहिले आहे.’या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख 98 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. 6 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करून या जलचर प्राण्याचे नाव सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काहींनी चेष्टेने त्याचे नाव ‘कोरोना’ ठेवले आहे तर काहीजण म्हणतात की हा खेकडा आहे.
एका युजरने कमेंटमध्ये प्रश्नार्थक टोनमध्ये म्हटले आहे की, ‘हे टायगर क्रॅब (खेकडा) दिसत आहे?’, तर दुसऱ्या यूजरनेही त्याच स्टाइलमध्ये ‘ गोगलगाय’ म्हटले आहे. बहुतेक लोकांनी या जलचर प्राण्याला खेकडा असल्याचे सांगितले असले तरी, या विचित्र प्राण्याची रचना ज्या प्रकारे आहे, ते पाहून लोक आश्चर्यचकित होतात आणि ते काय आहे याचा बरोबर अंदाजही येत नाही?
हेही पाहा: